सार

इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री यांचे हेलिकॅप्टर अपघातात निधन झाले आहे. बचाव पथक तेथे पोहचण्याचा आधी हिमवादळाचा सामना करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांचा हेलिकॅप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराणच्या अधिकाऱ्याने मीडियाला यासंदर्भात माहिती दिली आहे. दाट धुक्यात डोंगराळ भागात हेलिकॅप्टरला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. हेलिकॅप्टर सापडले तेव्हा प्रवासी जिवंत असल्याचे कोणतेही चिन्ह नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. अजरबैजान येथील पुलाचे उदघाटन करून येत असताना हा अपघात झाला होता. 

बचावकर्त्यांना करावा लागला हिमवादळाचा सामना - 
बचावकर्त्यांना अपघातग्रस्त ठिकाणी जाईपर्यंत हिमवादळाचा सामना करावा लागला. बचाव पथकाला येथे पोहचण्यासाठी बराच वेळ लागला. येथे धुके असल्यामुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे. इराण आणि अजरबैजान या दोन देशांच्या सीमेवर असणाऱ्या जोल्फा परिसरात हा अपघात झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक - 
इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्या निधनाने मला खूप दु:ख आणि धक्का बसल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे.
आणखी वाचा - 
लोकसभेचे सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट'
भारताचे रिझर्व्ह गोल्ड ठेवलेले शहर आहे 'या' देशात, कधीकाळी त्या देशाने केले आहे भारतावर राज्य