Aadhaar Card : आधारशी संबंधित गुन्हे कराल तर तुरुंगवास आणि दंड होऊन बसेल खिशालाही फटका

| Published : May 18 2024, 11:45 AM IST / Updated: May 18 2024, 11:46 AM IST

Aadhaar Card Update

सार

आधार कार्डचा नंबर चुकून शेअर केला आणि एखादा गुन्हा घडला तर आपल्याला तुरुंगवास होऊ शकतो आणि दंड भरावा लागणार आहे. आधार कार्डवरून एखादी व्यक्ती आपल्या नावावर सिम कार्ड घेतले जाऊ शकतात किंवा बँकेतून पैसे काढले जातील. 

सध्याच्या काळात आधार असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. प्रत्येक कामासाठी कागदपत्रे मागितल्यानंतर त्यामध्ये आधार कार्ड असणे आवश्यक असते. आधार कार्डचा उपयोग होता तसे त्याचे तोटे मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता असते. आपणही आधारशी संबंधित कोणते गुन्हे आहेत आणि त्यामुळे कोणते तोटे किंवा त्रासाला आपल्याला सामोरे जावे लागू शकते हे जाणून घेऊयात.

अशा प्रकारे होऊ शकतो गैरवापर -
 आपली सर्वात मोही फसवणूक आधारही संबंधित माहिती आपण शेअर केल्यास होऊ शकते. आपला आधार कार्ड नंबर एखाद्या व्यक्तीला माहिती झाल्यास आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. आपल्या आधार कार्डशी संबंधित माहिती एखाद्या व्यक्तीला माहिती असल्यास ती व्यक्ती आपली आर्थिक फसवणूक करू शकते, आपल्या नावावर सिम कार्ड घेऊ शकते किंवा इतरही प्रकारे आपली फसवणूक होण्याची शक्यता असते.

तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो? - 
आपल्या आधार कार्डचा आणि त्यावर असणाऱ्या नंबरचा दुरुपयोग करून बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. त्यामुळे आपले पूर्ण बँक खाते रिकामे होऊ शकते. बँक खात्यातून पैसे काढून घेतल्यानंतर आपल्याजवळ काहीच रक्कम शिल्लक राहणार नाही. तसेच आपल्या नावावर एखाद्या गुन्हेगाराने सिम घेऊन गुन्हा केल्यास पोलिसांच्या ससेमीराचा सामना करावा लागू शकतो. 

आधार कायदा काय म्हणतो?  -
आधार कायदा सांगतो की, "अशा गुन्ह्यांपासून आणि आधार आणि त्याच्याशी संबंधित माहितीचा दुरुपयोग यापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आधार योजना 2016 अंतर्गत आधारही संबंधित गुन्ह्यासाठी उपाययोजना असून त्या गुन्ह्यांच्या बाबतीत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 
आणखी वाचा - 
कन्हैय्या कुमारवर हल्ला करणारी व्यक्ती आहे तरी कोण? हल्ल्यानंतर धडा शिकवल्याचे व्यक्त केले मत
हरियाणामध्ये चालत्या बसला लागली आग, आगीत होरपळून 8 भाविकांचा मृत्यू आणि 12 पेक्षा जास्त जखमी