हरियाणामध्ये चालत्या बसला लागली आग, आगीत होरपळून 8 भाविकांचा मृत्यू आणि 12 पेक्षा जास्त जखमी

| Published : May 18 2024, 09:17 AM IST / Updated: May 18 2024, 09:18 AM IST

bus fire .jpg

सार

हरियाणात बसला आग लागल्यामुळे आठ भाविकांचा मृत्यू झाला असून बारापेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. चालत्या बसमधून धूर येत असल्यामुळे एका बाईक चालवणाऱ्या बाईक चालकाने ड्रायव्हरला सांगितल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. 

हरियाणात भीषण अपघात झाला असून आठ भाविकांचा मृत्यू झाला असून डझनभर इतर भाविक जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील मथुरा आणि वृंदावन यात्रेहून नुह येथे बसला आग लागल्याची घटना घडली. हरियाणातील कुंडली पानेसर महामार्गावर रात्री बसला आग लागल्याने भाविकांचा मृत्यू झाला आहे. पंजाबचे रहिवासी असलेले 60 पेक्षा अधिक लोक या बसमध्ये होते. 

बसमधून बाहेर येत होता धूर - 
शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास बसच्या मागील बाजूकडून धुराचा वास येत असल्याचे वाचलेल्या लोकांनी सांगितले. एक मोटारसायकलस्वाराला मागील बाजूस आग लागल्याचे दिसून आले आणि त्यानंतर बसचा त्याने पाठलाग केला. त्याने पाठलाग केल्यानंतर बस चालकाला बस थांबवण्याचा आदेश दिला. 

वाचलेल्या व्यक्तीची आपभीती - 
वाचलेल्या व्यक्तीने सांगितले की, "आम्ही दहा दिवसांसाठी पवीत्र स्थळांच्या दर्शनासाठी बस भाड्याने घेतली होती. आम्ही शुक्रवारी रात्री घरी परतत होतो. झोपेत असतानाच आम्हाला धुराचा वास यायला सुरुवात झाली. एका मोटारसायकलस्वाराने आमच्या गाडीतून धूर येत असल्याची माहिती चालकाला दिली आणि त्यानंतर त्याने बस थांबवली. त्यानंतर सर्वजण एक एक करून बसमधून उतरल्याचे त्याने सांगितले आहे. 

बस थांबल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती देऊन आग विझविण्याचा आणि लोकांना वाचवायचा प्रयत्न केला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचल्यानंतर आग आटोक्यात आणली आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. बस पूर्णपणे जळून खाक झाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोचल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. बसची आग वाढत असताना आम्ही जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्यासाठी खिडकीच्या काचा तोडल्या आणि पोलिसांना सांगितले. पोलिसांना यायला बराच वेळ लागला होता. या आगीचे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. 
आणखी वाचा - 
काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमार प्रचार करत असताना झाला हल्ला, हल्लेखोरांनी व्हिडीओ जारी करून केले समर्थन
दिल्ली मद्य उत्पादन शुल्क मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख आरोपी, ईडीने केले आरोपपत्र तयार