सार

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक मुलगा बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना खिडकीतून जमिनीवर पडतो. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तो मुलगा दरवाजाऐवजी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करतो.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठया प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्या बाजूला तोच बसमधून बाहेरही काचेला धरून पडल्याचे दिसले आहे. यामध्ये गर्दी खूप असल्यामुळे सर्वच प्रवासी बसमध्ये जागा कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत, तर तो मुलगा खिडकीतून चढत आहे. 

खिडकीतून जोरात पडला जमिनीवर - 
खिडकीतून व्हिडिओमधील मुलगा जमिनीवर पडल्याचे दिसले आहे. मुलगा दरवाजातून गर्दी असल्यामुळे खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न करताना त्याला सुरुवातीला तिथून चढता येत नाही त्यामुळे तो खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करतो. पण खिडकीत आल्यानंतर तो त्याला लोंबकळून आतमध्ये जायला पाहतो पण अशावेळी नेमकी खिडकी निघून येते आणि यावेळी मुलगा जमिनीवर जोरात पडतो. यावेळी बसमधील सर्वजण त्या मुलाला किती लागले आहे हे पाहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर सरकार झाले ट्रोल - 
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारला सर्वांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सरकारने परिवहन महामंडळासाठी कोणत्याही प्रकारचा निधी दिला नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही लोकांनी बसमधील इतर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून बसच्या दुर्दशेवर ताशेरे ओढले आहेत. यामध्ये खासकरून परिवहन महामंडळाची नाचक्की झाली आहे. अशा घटनांमुळे सरकारचे परिवहन महामंडळाकडे लक्षच नाही का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आणखी वाचा - 
 Budget 2024 : नोकरीसह महिला व गरिबांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, वाचा सविस्तर
Budget 2024 : बजेटमध्ये तरुणांना खास भेट, थेट EPFO ​​खात्यात जमा होणार 15 हजार