अयोध्येत उभारणार 7 स्टार Vegetarian Retreat, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची घोषणा

| Published : Jan 17 2024, 06:21 PM IST / Updated: Jan 17 2024, 06:26 PM IST

ayodhya vegetarian food

सार

7 Star Vegetarian Hotel in Ayodhya : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अशातच देशातील पहिले 7 स्टार आलिशान हॉटेल उभारले जाणार आहे. खास गोष्ट अशी की, या हॉटेलमध्ये तुम्हाला केवळ शाकाहारी फूड मिळणार आहे.

7 Star Vegetarian Hotel in Ayodhya : अयोध्येत 16 जानेवारीपासूनच प्राणप्रतिष्ठेसंदर्भातील कार्यक्रमांची सुरूवात झाली आहे. अशातच मुख्य प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यची सर्वांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. सोहळ्यासाठी तयारी अंतिम टप्यात आली आहे. याशिवाय प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह काही प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थिती लावणार आहेत. अशातच देशातील पहिले 7 स्टार आलिशान हॉटेल उभारले जाणार असल्याचे समोर आले आहे. खास गोष्ट अशी की, तुम्हाला या हॉटेलमध्ये केवळ शाकाहारीच पदार्थ चाखायला मिळणार आहेत.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी भारतातील 7 स्टार शाकाहारी हॉटेल उभारणार असल्याचा खुलासा केला आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला नॉन-व्हेज पदार्थ अजिबात मिळणार नाहीत.

पहिल्यांदाच उभारले जाणार 7 स्टार शाकाहारी हॉटेल
7 स्टार शाकाहारी हॉटेलचे बांधकाम मुंबईतील रिअल इस्टेट फर्म, द हाउस ऑफ अभिनंदन लोढा (The House of Abhinandan Lodha) यांच्याद्वारे केले जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उचललेले हे पाऊल एक अभूतपूर्व बदलावाचे प्रतीक असल्याचे बोलले जात आहे. कारण अद्याप देशात एकही 7 स्टार शाकाहारी हॉटेल बांधण्यात आलेले नाही.

आध्यात्मिक केंद्र बनणार अयोध्या
कमीतकमी 110 हॉटेल व्यावसियांद्वारे शरयू नदीच्या तटावर जमीन सुरक्षित करण्यासह अयोध्या आध्यात्मिक अनुभवांचे केंद्र बिंदू होण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. पण यादरम्यान अयोध्येतील मंदिरच नव्हे तर येथील फूडवर देखील लक्ष केंद्रित केले जात आहे.

प्रसादासाठी तयार केला जाणार 7 हजार किलोंचा स्पेशल हलवा
रिपोर्ट्सनुसार, सध्या अयोध्येत महागडे असे कोणतेही फूड नाही. पण अपेक्षा आहे की, अयोध्येतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड येथे आलेल्या पाहुण्यांचा खाण्याची लज्जत वाढवणार आहे. याशिवाय राम मंदिराच्या सोहळ्यासाठी 7 हजार किलोंचा स्पेशल हलवाही तयार केला जाणार आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Ceremony : रामललांसाठी 12 लाखांहून अधिक भक्तांनी हातमागावर विणकाम करुन तयार केले रेशमी वस्र

Odisha : जगन्नाथ पुरी हेरिटेज कॉरिडॉरचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले उद्घाटन, 800 कोटी रूपयांचा खर्च करून बांधण्यात आलाय प्रकल्प

57 वर्षांपूर्वी राम मंदिराबद्दल करण्यात आली होती भविष्यवाणी, सोशल मीडियावर पोस्टाचे तिकीट व्हायरल