सार

हरियाणा येथील फरीदाबादमधील एका 23 वर्षीय तरुणीचा महाराष्ट्र ते राजस्थान-बिहारच्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर….

Crime News : सानिया उर्फ गुडिया नावाच्या 23 वर्षीय मुलीचा शोध पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून घेतला जात आहे. तिचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र, राजस्थान आणि हरिणामधील पोलीस कामाला लागले आहेत. खरंतर सानियाने असे काही केलेय की, तिच्यामुळे सात पोलीस कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. सोनियाचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. पण अद्याप तिच्याबद्दल कोणताही पुरावा सापडलेला नाही. या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारशी सानियाचे कनेक्शन
खरंतर, सानिया सायबर हल्लेखोर आहे. तिने महाराष्ट्रातील पुण्यातील एका कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना चुना लावला आहे. याशिवाय हरियाणा येथे बसल्या-बसल्या चार कोटींहून अधिक रक्कम बँक खात्यातून काढली आहे. यामुळे पुण्यातील सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सानियाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सानियाबद्दल तपास केल्यानंतर कळले की, ती बिहार येथे असू शकते.

हरियाणातील फरीदाबाद येथे राहणारी सानिया
पुणे पोलीस बिहार येथे आल्यानंतर कळले की, सानिया हरियाणा येथील फरीदाबाद येथे राहणारी आहे. यानंतर पुणे पोलिसांनी फरीदाबाद गाठत तिला ताब्यात घेतले. कोर्टासमोर सानियाला हजर केल्यानंतर तिला अटक करत दुरंतो एक्सप्रेसच्या माध्यमातून पोलीस पुणे येथे घेऊन येत होते.

बेड्या तोडून काढला पळ
सोमवारी (19 फेब्रुवारी) रात्री दोन वाजताच्या सुमारास सात पोलीस तिच्यासोबत होते. पण रात्र झाल्यानंतर सर्वजण एकामागून एक झोपी गेले. यादरम्यान, ट्रेन राजस्थानमधील कोटा शहरातील स्थानकात थांबली असता सानियाने हातातल्या बेड्या तोडून पळ काढला. तिला शेवटचे कोटाच्या स्थानकातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून पाहिले गेले. संपूर्ण दिवसभर सानियाचा शोध घेतला असता तिच्याबद्दल जीआरपी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता तीन राज्यांच्या पोलिसांकडून सानियाचा शोध घेतला जात आहे.

आणखी वाचा : 

Mumbai : मानसिक रुपात आजारी महिलेने औषध न खाल्ल्याने घेतला मुलीचा जीव, बोरिवलीतील धक्कादायक घटना उघडकीस

'मी अमित शाह बोलतोय...' माजी आमदाराला फोन करत निवडणुकीच्या तिकिटासाठी केली पैशांची मागणी, वाचा पुढे काय घडले

Haldwani Violence : 'आम्हाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला', महिला पोलीस कर्मचाऱ्याने सांगितली हिंसाचारावेळी घडलेली घटना