Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Attempt : छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ हस्तक्षेपामुळे मुलीला वाचवण्यात यश आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
- Home
- India
- 16th July 2025 Updates: Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Attempt - छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा थरार!, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
16th July 2025 Updates: Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Attempt - छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा थरार!, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

16th July Updates : ओडिसामधील बालासोर येथे फकीर महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या आत्मदहनामुळे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ बिजू जनता दलाने बालासोर बंदची हाक दिली आहे. याशिवाय दिल्लीतील द्वारका येथील सेंट थॉमस शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तर महाराष्ट्रात पावसाने काही जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. खासकरुन कोकण, रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. असेच ताजे अपडेट्स एशियानेट मराठीच्या वेबसाइटवर एका क्लिकवर वाचा…
16th July 2025 Updates Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Attempt - छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा थरार!, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
16th July 2025 Updates PM Kisan 20th Installment - पीएम किसानचा २०वा हप्ता लवकरच!, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा होणार; लगेच तपासा तुमचं नाव!
PM Kisan 20th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारय. १८ किंवा १९ जुलै २०२५ रोजी ही रक्कम जमा होण्याची शक्यता असून, PM मोदी १८ जुलै रोजी बिहारमधून हप्ता वितरित करतील अशी चर्चा आहे.
16th July 2025 Updates PM National Child Award 2025 - अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै! आजच अर्ज करा
नवी दिल्ली- प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ३१ जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ५ ते १८ वयोगटातील मुलांना विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी अर्ज करता येईल. https://awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करा.
16th July 2025 Updates HAL Nashik Bharti 2025 - HAL नाशिकमध्ये अप्रेंटिस पदांसाठी 278 जागांची भरती, लगेच अर्ज करा!
HAL Nashik Bharti 2025 : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), नाशिक येथे पदवीधर/डिप्लोमाधारक अप्रेंटिससाठी २७८ जागांसाठी अर्ज मागवित आहे. अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे.
16th July 2025 Updates Katrina Kaif Birthday - विकी कौशलने खास फोटो शेअर करत कॅटरिनाला केले विश
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी पती विकी कौशलने तिला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
16th July 2025 Updates South Western Railway Bharti 2025 - दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये सुवर्णसंधी!, 904 ‘ITI अप्रेंटिस’ पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा
South Western Railway Bharti 2025 : दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात ITI अप्रेंटिस पदांसाठी 904 रिक्त जागांवर भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 13 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करा.
16th July 2025 Updates अमेरिका-कॅनडा येथील प्रेक्षकांसाठी इशारा - बॉस IPTV सारख्या बेकायदेशीर सेवांचा वापर करताना दोनदा विचार करा
YuppTV ने अमेरिका आणि कॅनडामधील प्रेक्षकांना बॉस IPTV सारख्या बेकायदेशीर IPTV सेवांबद्दल इशारा दिला आहे आणि गंभीर कायदेशीर, आर्थिक आणि सुरक्षा जोखिम अधोरेखित केले आहेत.
16th July 2025 Updates PM Dhan Dhanya Krishi Yojana - शेतकऱ्यांसाठी खुशखबर!, 'धन-धान्य' योजनेला कॅबिनेटची मंजुरी
PM Dhan Dhanya Krishi Yojana : केंद्रीय कॅबिनेटने 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना' मंजूर केली आहे. या योजनेचा लाभ 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून, शेती अवजारे, बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
16th July 2025 Updates Ambadas Danve - सोन्याचा चमच्यावरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला, दानवेंच्या निरोप समारंभात राजकीय धुरळा!
16th July 2025 Updates Ladki Bahin Yojana - लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी!, जुलैच्या हप्त्याआधीच ‘डबल’ आनंद
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत जून महिन्याचा हप्ता काही महिलांना मिळालेला नाही. मात्र, अशा महिलांना जुलैच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
16th July 2025 Updates Eknath Shinde - ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ एकत्र, एकनाथ शिंदेंनी टाकला नवा डाव, आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची युती जाहीर
बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संयुक्त युती जाहीर केली.
16th July 2025 Updates Gold Nose Rings - केवळ २ हजारांत मिळतील स्टायलिश नोज रिंग, पैठणीवर दिसेल हटके लूक!
मुंबई : महाराष्ट्रात २५ जुलै रोजी श्रावण मास सुरु होणार आहे. श्रावण म्हणजे महिलांचा हक्काचा सण. श्रावणात पैठणीला पसंती दिले जाते. पण तिच तिच नथ घालण्याचा कंटाळा आला असेल तर ही स्टायलिश नोज रिंग ट्राय करुन बघा. तुम्ही दिसाल ट्रेंडी.
16th July 2025 Updates सलमान खानचा 'बैटल ऑफ गलवान' ईदला प्रदर्शित होणार?
सलमान खानचा 'बैटल ऑफ गलवान' चित्रपट ईद किंवा बकरी ईदला प्रदर्शित होणार नाही. ईदला आधीच तीन चित्रपट प्रदर्शित होत असल्याने आणि बकरी ईदच्या सुमारास आयपीएलचे सामने सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
16th July 2025 Updates राज्यसभेची शपथ घेण्यापूर्वी अभिनेते कमल हासन यांनी रजनीकांत यांची घेतली भेट, मैत्रीचे अनमोल दर्शन
चेन्नई : अभिनेते आणि राजकारणी कमल हासन यांनी बुधवारी जिवलग मित्र रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव गायकवाड यांची चेन्नईतील पोएस गार्डन येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. राज्यसभेतील शपथविधीपूर्वीची ही खास भेट दोघांच्या दीर्घ मैत्रीचा प्रतीक ठरली.
16th July 2025 Updates Health Care - दिवसभर स्कीनी जीन्स घालता? डॉक्टरांनी सांगितले आरोग्यासंबंधित उद्भवतील हे गंभीर आजार
घट्ट जीन्स घातल्याने पुरुष आणि महिलांमध्ये आरोग्यासंबंधित काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसे की, पाठदुखी, स्नायू कमकुवत होणे. याशिवाय महिलांमध्ये योगीच्या आरोग्याला नुकसान पोहोचले जाते.
16th July 2025 Updates "सगळे पैसे गेले",दुबईत अर्चना पूरण सिंगची ऑनलाईन फसवणूक; स्वतः व्लॉगमधून केला खुलासा
कपिल शर्माच्या शो मध्ये जज म्हणून झळकणारी अर्चना पुरण सिंग हिची दुबईत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल अभिनेत्रीने स्वत: व्लॉगमधून माहिती दिली आहे.
16th July 2025 Updates तेलंगणातील १४ गावे अखेर महाराष्ट्रात होणार सामिल, बेळगाव कधी महाराष्ट्रात येणार? नागरिकांचा प्रश्न
कर्नाटकातील बेळगावसह आसपासची गावे कधी महाराष्ट्रात सामिल होतील, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. बेळगावचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यावर अद्याप काही तोडगा निघालेला नाही.
16th July 2025 Updates Tips for Weight Gain - वजन वाढवण्यासाठी आहारात कोणत्या फूड्सचा समावेश करावा?
अनेकांना वजन कमी करायचे असते. पण काहींना वजन वाढवायचे असते. यासाठी वेगवेगळे व्यायाम आणि डाएट फॉलो केले जातात. अशातच घरच्याघरी सोप्या पद्धतीने आणि उपायांनी वजन वाढवू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
16th July 2025 Updates Katrina Kaif Birthday Today - कॅटरीना कधीही शाळेत गेली नाही, आधी हिंदीही येत नव्हती, वाचा तिच्याविषयी माहित नसलेली तथ्ये
मुंबई - कॅटरीना कैफ हे नाव आज बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिच्या सौंदर्यामुळे आणि मेहनतीने ती आज एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे. मात्र कॅटरीना कैफच्या आयुष्यातील काही बाबी अशा आहेत ज्या सर्वसामान्य प्रेक्षकांना फारशा माहीत नाहीत.
16th July 2025 Updates Pagalgam Terror Attack - पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल प्रत्यदर्शींने NIA ला दिली मोठी अपडेट, दहशदतवाद्यांनी आनंदात हवेत चार राउंड केले फायरिंग
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. अशातच आता NIA ला प्रत्यदर्शींने एक मोठी अपडेट दिली आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आनंदात फायरिंग केली होती.