२०२४ मधील गुगलवर सर्वाधिक शोधलेली भारतातील टॉप १० व्यक्तिमत्त्वे

| Published : Dec 11 2024, 11:27 AM IST / Updated: Dec 11 2024, 11:32 AM IST

10 most searched personalities

सार

२०२४ मध्ये भारतात गुगलवर सर्वाधिक शोधलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये  राजकारणी, खेळाडू, कलाकार आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.

२०२४ वर्ष संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. यावर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक शोधलेले सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व कोणते आहेत ते पाहू या. या यादीत विनेश फोगट आणि इतर अनेक ज्ञात नावं आहेत. चला त्यावर एक नजर टाकूया:

१. विनेश फोगट

कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरवण्यात आल्याने ती भारतात सर्वाधिक शोधली जाणारी व्यक्तिमत्त्व बनली. यानंतर '१०० ग्रॅम' हा शब्द X वर देखील ट्रेंड झाला. लोकांनी तिला 'forever golden girl' म्हटले. महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल फायनलपूर्वी तिचे वजन १०० ग्रॅमने जास्त असल्याचे आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. नंतर तिने हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ती आमदार म्हणुन निवडुण आली.

२.नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भूमिका बदलण्यासाठी ओळखले जातात आणि हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान देखील समोर आले. बिहारचे मुख्यमंत्री राजकारणात किंगमेकर ठरल्याने सोशल मीडिया नितीशकुमार यांच्या मीम्सने भरला होता.

३.चिराग पासवान

चिराग पासवान हे माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र असून ते माजी अभिनेते होते. हे वर्ष त्यांच्यासाठी उल्लेखनीय वळणाचे ठरले आहे, कारण एकेकाळच्या महत्त्वाकांक्षी चित्रपट स्टारने २०२४ च्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेतली आणि मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपद मिळवले.

४. हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टॅनकोविचसोबत लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोटामुळे चर्चेत राहिला आणि गुगलच्या यादीतही स्थान पटकावले.

५.पवन कल्याण

अभिनेता असलेल्या पवन कल्याण यांनी या वर्षी जून २०२४ पासून आंध्र प्रदेशचे १० वे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी जलसा (२००८), गब्बर सिंग (२०१२, आणि भीमला नायक (२०२२) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पवन कल्याण यांनी देखील सर्वात जास्त गुगल सर्च केलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

६.शशांक सिंग

२५ वर्षीय शशांक सिंग हा २०२३ मध्ये एकाच सामन्यात १५० धावा आणि ५ विकेट घेणारा पहिला भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू बनला. २०२४ इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील त्याच्या कामगिरीसाठी आणि त्याच्या आक्रमक अष्टपैलू फॉर्मसाठी तो प्रसिद्ध झाला.

७. पूनम पांडे

मॉडेल पूनम पांडे यावर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव केल्याने ट्रेंडमध्ये आली. यामुळे तिची बरीच चर्चा झाली. प्राथमिक अहवालात तिचा मृत्यू झाल्याचे मानले जात होते. तिच्या कृत्याने मीडियाचे लक्ष वेधले आणि गर्भाशयाच्या कर्करोगावर ऑनलाइन शोध घेतला गेला. अशा कृत्यामुळे तिच्यावर टिका देखील झाली.

८. राधिका मर्चंट

अंबानींच्या घराण्यात काय चाललंय हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं असतं. १२ जुलै रोजी अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंटसोबत ६ दिवस चाललेल्या भव्य सोहळ्यात लग्न केले. तिच्या अंबानींशी असलेल्या संबंधांमुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे इंटरनेटवर तिच्या नावाचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची ती मुलगी आहे.

९. अभिषेक शर्मा

या २३ वर्षीय क्रिकेटपटूने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात वेगवान ५० धावा केल्या आणि त्याचे नाव सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आले. आयपीएल आणि टी-२० मधील झिम्बाब्वे विरुद्धच्या त्याच्या कामगिरीने देखील मने जिंकली, कारण पुरुष क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध टी-२० मध्ये आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज होता.

१०. लक्ष्य सेन

या भारतीय बॅडमिंटनपटूने यावर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि गटात तिसऱ्या मानांकित इंडोनेशियाच्या जोनाटन क्रिस्टीचा पराभव केला. त्याने १६ व्या फेरीत आपला देशबांधव प्रणॉय एच एस विरुद्ध विजय मिळवला. तसेच उपांत्यपूर्व फेरीत चौ तिएन-चेनचा पराभव केला. त्याचा 'बिहाइंड-द-बॅक' शॉट व्हायरल झाला आणि चाहते प्रभावित झाले.

आणखी वाचा-

राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी आणला अविश्वास प्रस्ताव