- Home
- Entertainment
- करण जोहर शोमध्ये विराट कोहलीला का नाही बोलावणार, कारण ऐकून म्हणाल हा तर हुशार निघाला
करण जोहर शोमध्ये विराट कोहलीला का नाही बोलावणार, कारण ऐकून म्हणाल हा तर हुशार निघाला
करण जोहरने 'कॉफी विथ करण' शोमध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यासोबत झालेल्या वादानंतर कोणत्याही क्रिकेटपटूला न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकच्या महिलांवरील वादग्रस्त विधानामुळे दोघांवर बीसीसीआयने बंदी घातली होती.

करण जोहर शोमध्ये विराट कोहलीला का नाही बोलावणार, कारण ऐकून म्हणाल हा तर हुशार निघाला
करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो कायमच चर्चेत राहिला. या शोमध्ये अनेक स्टार्सने त्यांच्या आयुष्यातील गुपित सांगितली आणि नंतर काहींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यामध्ये खासकरून हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच नाव समोर येतं.
करण कोणत्याही क्रिकेटपट्टूला शोमध्ये नाही बोलावणार
करण हा कोणत्याही क्रिकेटपट्टूला शोमध्ये बोलावणार नसल्याचं त्यानं यावेळी बोलताना सांगितलं आहे. मी केएल आणि हार्दिकच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर कोणत्याही क्रिकेटपट्टूला बोलवायचा निर्णय माझ्या डोक्यात आला नाही.
खेळाडूंना बोलावलं तरी ते येणार नाहीत
अनेक खेळाडूंना बोलावले तरी ते येणार नाहीत, त्यामुळं मी कोणालाही परत शोला बोलावण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी हार्दिकने महिलांच्या बाबतीत एक विधान केलं होतं, त्यामुळं त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
हार्दिक काय म्हणाला होता?
यावेळी बोलताना हार्दिक म्हणाला होता की, त्याने त्याच्या पालकांना सांगितलेलं की, 'जेव्हा मी माझी व्हर्जिनिटी गमावेन, तेव्हा मी सांगेन आज मी करून आलोय.'
दोनही खेळाडूंवर बीसीसीआयने घातली होती बंदी
यावेळी या खेळाडूंवर बीसीआयने बंदी घातली आहे. भारतीय क्रिकेट बीसीसीआयने त्यांच्या घटनेच्या नियम ४१ अंतर्गत पंड्या आणि राहुल दोघांनाही तात्पुरते निलंबित केलं.
करणने स्वतःला धरलं जबाबदार
करण जोहर बोलताना म्हणतो की, मी स्वतः जबाबदार आहे कारण हा माझा शो आणि माझा प्लॅटफॉर्म होता. मी त्यांना पाहुणे म्हणून बोलावलं होतं.

