हिना खानसोबत रॉकीने पैशासाठी केलं लग्न, तो नेमकं काय म्हणाला?
टीव्ही अभिनेत्री अक्षरा आणि तिचा प्रियकर रॉकी जयस्वाल 'पती पत्नी और पंगा' मध्ये एकत्र दिसणार आहेत. रॉकीने त्याच्यावर झालेल्या संपत्ती आणि स्टारडमच्या फायद्याबद्दलच्या आरोपांवर मौन सोडले आहे.

हिना खानसोबत रॉकीने पैशासाठी केलं लग्न, तो नेमकं काय म्हणाला?
हिना खान आणि रॉकी या दोघांचं लग्न झालं. यामध्ये रॉकी यांनी पैशासाठी लग्न केलं का असं म्हटलं आहे.
अक्षरा आणि रॉकी दोघे एकत्र काम करणार
टीव्ही अभिनेत्री अक्षरा हि कायमच चर्चेत येत असते. तीच खरं नाव हिना खान असून तिचा प्रियकर रॉकी जयस्वालसोबत लग्न केलं आहे. दोघेही बरीच वर्ष एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. दोघेही बरीच वर्षे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. सध्या हे कपल कलर्स वरील पती पत्नी और पंगा या शोमध्ये एकत्र धमाल करताना दिसत आहेत.
संपत्तीवरून नवऱ्याने लग्न केल्याचे आरोप
हिनाचा नवरा रॉकीने अभिनेत्रीच्या स्टारडमचा फायदा घेत असल्याचा आणि तिच्या संपत्तीबद्दल असुरक्षित असल्याचे आरोप त्याच्यावर झाले. बऱ्याचदा त्याच्यावर टीका झाली असून या सर्व आरोपांवर आपले मौन सोडले आहे. त्याला त्याचे पोझिशन आणि प्लेसमेंट माहित आहे. ट्रोलिंगवर बोलताना रॉकी म्हटला की, त्याने त्याची पत्नी आणि अभिनेत्री हिनासोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आधी चर्चा केली होती.
रॉकी काय म्हणाला?-
"मला वाटत नाही की आम्हाला कधीही लोकांचे लक्ष वेधायचे होते. मला माहित आहे की ती एक सेलिब्रिटी आहे, मला माहित आहे की ती एक स्टार आहे, मला माझे स्थान आणि माझे पोझिशन माहित आहे. तिच्या पाठीवर बसून मला काही बनायचे नाही. मला ते नकोच आहे, जर मला काहीतरी बनायचे असेल तर मी स्वतः काहीतरी बनलो असतो. आणि मी जास्त ग्लॅमर किंवा लक्ष वेधून घेणाऱ्यांमधला मी अजिबात नाही."
संपत्तीबद्दल असुरक्षित आहेत का?
"मी हिना एवढी कमाई करत नाही. ती स्वतः एक स्टार आहे. हिना स्टार असल्याने मला काही फायदा होतो का? तर हो... म्हणूनच आम्ही एकत्र आहोत का? तर अजिबात नाही! मी असुरक्षित नाही. मला माहित आहे की जर मी हिना खानसोबत कुठेही गेलो तर तिचे रिप्रेझेंटेशन आणि लोकांची प्रतिक्रिया सर्व प्रकारे जास्त असतील. मी साठी का रागावू? मी याबद्दल असुरक्षित का वाटून घेऊ?" असं रॉकीने म्हटलं आहे.