अमिताभ बच्चन यांना पैशांची गरज का लागली, कारण ऐकून खिशात घालाल हात
अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथील दोन प्रीमियम फ्लॅट विकले आहेत, जे त्यांनी २०१२ मध्ये खरेदी केले होते. ते सातत्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असून, त्यांनी अलीकडेच अलिबागमध्ये जमीन आणि मुलुंडमध्ये अनेक फ्लॅट खरेदी केले आहेत.

अमिताभ बच्चन यांना पैशांची गरज का लागली, कारण ऐकून खिशात घालाल हात
अमिताभ बच्चन हे कायमच चर्चांमध्ये राहत असतात. ते केबीसी, घरगुती वाद किंवा चित्रपटाच्या माध्यमातून कायमच माध्यमांमध्ये झळकताना दिसून येतात. त्यांनी चांगला आणि वाईट दोनही काळ जवळून पहिले आहेत.
अमिताभ यांनी एका प्रॉपर्टीबाबत महत्वपूर्ण निर्णय
अमिताभ यांनी मुंबईतील एका प्रॉपर्टीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमिताभ यांनी त्यांचे मुंबईतील दोन फ्लॅट विकले आहेत. हे दोनही फ्लॅट मुंबईतील एकदम प्रीमियम परिसरात असल्याची माहिती समजली.
मुंबईत फ्लॅट कोठे होते?
दोन्ही फ्लॅट गोरेगाव पूर्वेतील ओबेरॉय एक्झिट बिल्डिंगमध्ये होती. 2012 ला 8.12 कोटींना अमिताभ बच्चन यांनी हे फ्लॅट खरेदी केले होते. ओबेरॉय एक्झिट बिल्डिंगच्या 47 व्या मजल्यावर हे फ्लॅट होती.
अमिताभ मुंबईतील विकत आहेत संपत्ती
अमिताभ हे मुंबईतील संपत्ती सातत्याने विकत असल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी अंधेरी येथील इमारतीतील डुप्लेक्स अपार्टमेंट ही ८३ कोटींना विकली. त्यांनी गोरेगावमध्ये फ्लॅट खरेदी करून जवळपास ४७ टक्के नफा कमावला होता.
अमिताभ यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवला पैसा
अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवत आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांनी मुलुंड पश्चिमेतील ओबेरॉय रिअल्टीच्या एटर्निया प्रकल्पात तब्बल 10 फ्लॅट खरेदी केले होते, ज्याची एकूण किंमत 24.95 कोटी रुपये होते.
अलिबागमध्ये केली मोठी जमीन खरेदी
अलिबागमध्ये अमिताभ यांनी मोठी जमीन खरेदी केली आहे. त्यांनी स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी ही जमीन खरेदी केली होती.

