- Home
- Entertainment
- आमच्या शोमध्ये आम्ही दर आठवड्याला बहिणी आहोत, 'या' कलाकाराने केबीसीमध्ये येऊन घेतली बिग बींची फिरकी
आमच्या शोमध्ये आम्ही दर आठवड्याला बहिणी आहोत, 'या' कलाकाराने केबीसीमध्ये येऊन घेतली बिग बींची फिरकी
'कौन बनेगा करोडपती १७' च्या नवीन भागात प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर यांनी हजेरी लावली. या दोघांनी आपल्या विनोदी अंदाजाने सेटवर हास्यकल्लोळ माजवला, जिथे कृष्णाने धर्मेंद्र यांची नक्कल केली तर सुनीलने एक मजेदार गाणे सादर केले.

आमच्या शोमध्ये आम्ही दर आठवड्याला बहिणी आहोत, 'या' कलाकाराने केबीसीमध्ये येऊन घेतली बिग बींची फिरकी
अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती १७ हा शो चर्चेत येत असतो. या शोमुळे अनेक लोक श्रीमंत झाले आहेत. कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी हा या कार्यक्रमात दिसून आला होता.
तुम्ही पोट धरून हसायाला लागाल
नवीन भागात आता कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर हे दिसून आले होते. शोचा एक प्रीमियम सादर केला असून त्यामध्ये त्या दोन्ही कॉमेडियन यांनी हसवले. हा व्हिडीओ पाहून आपण नक्कीच पोट धरून हसाल.
केबीसीच्या सेटवर हास्याचे वातावरण तयार
केबीसीच्या सेटवर हास्याचे वातावरण तयार झालं आहे. पांढरा सूट घातलेला आणि क्लीन शेव्ह केलेला सुनील त्याचे मजेदार गाणे म्हणताना दिसून आला. त्याची स्टाईल पाहून सगळे हसायला लागले.
कृष्णा अभिषेकने कोणता प्रश्न विचारला?
कृष्णा अभिषेकने यावेळी प्रश्न विचारला आहे. कृष्णा अभिषेक हा यावेळी जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या येथे आला होता. अमिताभ बच्चन यांनी यावेळी दोघांसोबत विनोद मजा मस्करी केल्याचं दिसून आलं आहे.
केबीसीचा १७ वा सिझन सुरु
केबीसीचा आता १७ वा सिझन सुरु झाला आहे. हा शो २००० मध्ये सुरु झाला होता आणि त्याचा १७ वा सिझन सुरु झाला आहे. अमिताभ यांनी १६ तर शाहरुखने एक सिझन होस्ट केला आहे.