- Home
- Entertainment
- 'या' प्रसिद्ध गायक लॉरेन्स बिश्नोई गँगने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगाचा उडेल थरकाप
'या' प्रसिद्ध गायक लॉरेन्स बिश्नोई गँगने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगाचा उडेल थरकाप
कॅनडामध्ये पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरावर आणि व्यापारी दर्शन सिंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य गोल्डी ढिल्लनने सोशल मीडियावर या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

'या' प्रसिद्ध गायक लॉरेन्स बिश्नोई गँगने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगाचा उडेल थरकाप
कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनेमुळे आता परत एकदा खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये लॉरेन्स बिष्णोई टीमचा सहभाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
भारतीय समुदायात पडला फरक
दरम्यान, गँगस्टर गोल्डी ढिल्लनने सोशल मीडियावर व्यापारी दर्शन सिंग यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणी जबाबदारी घेतली?
लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य गोल्डी ढिल्लनने कॅनडामधील घडलेल्या दोन्ही गोळीबारांच्या घटनांची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये गोल्डीने म्हटले आहे की, त्याच्याच गँगने व्यापारी दर्शन सिंग एक प्रमुख ड्रग्ज डीलर होता.
टोळीने पैसे मागितल्यावर दिला होता नकार
टोळीने त्याच्याकडून पैसे मागितले होते, त्याने नकार दिला आणि नंबर ब्लॉक केला. दरम्यान, पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरावर हल्ला करण्यात आला कारण तो लॉरेन्स बिश्नोईंच्या प्रतिस्पर्धी गँग सरदार खेराशी संबंधित असल्याचे बोलले जात होता.
सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य गोल्डी ढिल्लन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की त्याचे चन्नी नट्टन यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही. गोळीबाराचे खरे कारण गायक सरदार खेहरा आहेत.
पोस्टमध्ये दिला इशारा
पोस्टमध्ये इशारा देण्यात आला आहे. जो कोणी गायकासोबत काम करत राहील किंवा त्यांच्या संपर्कात राहील त्याला असेच परिणाम भोगावे लागतील. त्यांनी सरदार खेहराला हानी पोहोचवण्याची धमकीही दिली आहे.

