समय रैनाने आई वडिलांना गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून पायाला येतील मुंग्या
प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाने त्याच्या आई-वडिलांसाठी एक महागडी कार खरेदी केली आहे. त्याने टोयोटा वेलफायर ही गाडी घेतली असून, ज्याची किंमत जवळपास १.२ ते १.३ कोटी रुपये आहे. समयने या नवीन गाडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

समय रैनाने आई वडिलांना गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून पायाला येतील मुंग्या
समय रैना हा कॉमेडियन म्हणून प्रचंड प्रसिद्ध आहे. आता तो परत एकदा चर्चांमध्ये आला असून तो कोणत्याही वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला नसून आता त्यानं एक महागडी गाडी घेतली आहे.
समयने कोणती गाडी घेतली?
समय रैना हा कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असून त्यानं धनत्रयोदशीला स्वतःला एक गिफ्ट दिल आहे. समय रैनानं टोयोटा वेलफायर (Toyota Vellfire) गाडी खरेदी केली आहे. त्यानं या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
तो त्याच्या नवीन गाडीजवळ बसला होता
तो त्याच्या नवीन गाडीजवळ बसल्याच दिसून आलं आहे. फोटोंमध्ये तो त्याच्या नव्या गाडीजवळ उभा असल्याचं दिसतंय, यावेळी त्याच्यासोबत त्याचे आई-वडीलही दिसत आहेत.
कारची किंमत ऐकून फुटेल घाम
समय रैनाने महागडी गाडी घेतली असून तिची किंमत ऐकून आपल्याला नक्कीच घाम फुटू शकतो. त्या गाडीची किंमत जवळपास १.२ कोटी ते १.३ कोटी रुपये सांगण्यात आली आहे.
कारमध्ये कोणते स्पेसिफिकेशन आहेत?
या कारमध्ये आरामात 7 जण बसू शकतात. सीट अॅडजस्टमेंट, हीटिंग, मसाज आणि डेडिकेटेड फूटरेस्ट सारखे अनेक खास फिचर्स यात आहेत. या गाडीमध्ये आपण आरामात बसून प्रवास करू शकता.
युट्युब शोविरोधात झाला होता गुन्हा
समय रैनाच्या युट्युब शोविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मय रैनाचा यूट्यूब शो India's Got Latent वादाच्या भोवऱ्यात आलेला. फेब्रुवारीमध्ये आलेल्या एका एपिसोडमध्ये समय रैनाच्या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या रणवीर अलाहाबादियानं एका स्पर्धकाला त्याच्या आई-वडिलांबाबत एक आक्षेपार्ह्य प्रश्न विचारला. ज्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.