लग्नाआधी ठेवलेल्या शारीरिक संबंधावर दीपिका गेली बोलून, वाचून तुम्हीही जाल लाजून
अभिनेत्री दीपिका पदुकोण २०१५ साली 'माय चॉईस' या व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

लग्नाआधी ठेवलेल्या शारीरिक संबंधावर दीपिका गेली बोलून, वाचून तुम्हीही जाल लाजून
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत येत असते. लग्नापूर्वी तिने एक स्टेटमेंट केलं होतं त्यामुळे ती माध्यमांमध्ये चर्चेला आली होती. आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
वक्तव्य कधी चर्चेत आलं होतं?
दीपिकाने केलेलं वक्तव्य २०१५ साली चर्चेमध्ये आलं होतं. दीपिका ही माय चॉईस या व्हिडीओ कॅम्पेनमध्ये सहभागी झाली होती, त्यावेळी ती चर्चांमध्ये झळकली. त्यावेळी तिने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं.
दीपिका काय म्हणाली होती?
दीपिका म्हणालेली की, 'मला माझ्या आवडीनुसार आयुष्य जगायचं आहे. मला हवे तसे कपडे घालायचे आहेत. पुरुष असो वा स्त्री, कोणावर प्रेम करायचं ही माझी मर्जी आहे'
लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवायचे...
'लग्नाआधी कोणासोबत शारीरिक संबंध ठेवायचे, लग्नानंतर ठेवायचे की नाही ठेवायचे, हेसुद्धा माझ्यावर अवलंबून आहे.' असं यावेळी दीपिका पदुकोण हिने बोलताना सांगितलं होतं.
व्हिडिओनंतर दीपिका झाली ट्रोल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपिका मोठ्या प्रमाणाववर ट्रोल झाली होती. त्यानंतर तिने स्पष्टीकरण देताना तिला कोणालाही दुखवायचं नव्हतं असं म्हटलं. तिचा लग्न आणि नात्यांवर विश्वास असल्याचं तिने सांगितलं.
अभिनेत्रीचं लग्न कधी झालं?
अभिनेत्री दीपिका पदुकोण हीच लग्न हे २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केलं असून या जोडप्याला 'दुआ' नावाची मुलगी आहे.

