- Home
- Entertainment
- तुम बहोत खुबसुरत हो... रश्मिका मंदानासोबतच्या अफवांवर पहिल्यांदाच बोलला विजय देवरकोंडा
तुम बहोत खुबसुरत हो... रश्मिका मंदानासोबतच्या अफवांवर पहिल्यांदाच बोलला विजय देवरकोंडा
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा रंगलेल्या असतात. पण रश्मिकाने कधीही याची पुष्टि केलेली नाही आणि विजयनेही कधी खुल्या मनाने कबूल केलेले नाही. आता एका मुलाखतीत विजयने या नात्याबद्दल सांगितले आहे, जे सध्या व्हायरल होत आहे.

फिल्मफेअरच्या मुलाखतीत विजयला रश्मिकाबद्दल विचारण्यात आले होते. इंडस्ट्रीतील लोक त्यांचे नाव जोडत असतात, हे खरे आहे का?
विजय म्हणाला, "हे तर तुम्ही त्यांनाच विचारा." रश्मिकाबरोबरच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल तो म्हणाला, "मी रश्मिकाबरोबर जास्त चित्रपट केलेले नाहीत. मला आणखी करायला हवेत. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. ती सुंदर आहे. त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये काहीच अडचण येऊ नये."
विजयने रश्मिकाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या. "चांगली गोष्ट म्हणजे ती खूप मेहनती आहे. ती जिद्दी आणि दृढनिश्चयी आहे. ती चांगली माणूस आहे. सर्वांच्या सुखासाठी ती स्वतःला विसरते. वाईट म्हणजे ती खूपच जास्त करते. तिने थोडे संतुलन राखायला हवे."
विजयला लग्नाबद्दल विचारले असता तो म्हणाला, "मी एक दिवस नक्कीच लग्न करेन."
रश्मिकाने विजयला 'विज्जू' म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
विजय आणि रश्मिकाने 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' मध्ये काम केले आहे. विजयच्या 'VD14' चित्रपटात रश्मिका असू शकते, अशी चर्चा आहे. हा चित्रपट राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित करतील.

