सार

छावा सिनेमामुळे विकी कौशल सध्या चर्चेत आहे. अशातच नुकत्याच एका कार्यक्रमात विकी कौशलने आशा भोसलेंच्या पाया पडला तर राज ठाकरेंना मिठी मारल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकी कौशलच्या अशा वागण्याचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

Vicky Kaushal Viral Video : विकी कौशलने ‘छावा’ सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच पण त्याच्या साम्यंजस्याच्या वागणुकीमुळेही अनेकजण त्याच्यावर प्रचंड खूश आहेत. सध्या छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. याच दरम्यान, विकी कौशलने मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी स्टेजवर बसलेल्या पाहुण्यांचा आदर राखत विकी कौशल ज्या पद्धतीने वागला ते पाहून आता सर्वजण त्याच्या माणूसकीचेही कौतूक करत आहेत.

YouTube video player

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विकी कौशल सुप्रसिद्ध संगीतकार आशा भोसले यांच्या पाया पडताना दिसतोय. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंचीही गळाभेट घेताना विकी दिसतोय. या भावूक क्षणी अभिनेता रितेश देशमुख आणि सोनाली बेंद्रेनेही विकीला आनंदाने मिठी मारल्याचे दिसतेय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर चाहते आणि युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने म्हटले की, त्याने हे कमावले आहे. आशा आहे हे असेच राहिल. दुसरा म्हणतो, हा खरा छावा आहे. खरंतर, विकी कौशल यशाच्या शिखरावर असतानाही कोणताही गर्व न बाळगता ज्या पद्धतीने वागला त्याचे सर्वांना कौतूक वाटतेय.

छावा सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या 14 दिवसांमध्ये छावा सिनेमाने 400 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. याशिवाय सिनेमातील अक्षय खन्ना आणि विनीत कुमार यांच्या भूमिकेचेही प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे.

आणखी वाचा : 

अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुडा यांनी वीर सावरकरांना वाहिली आदरांजली

इंडियाज गॉट टॅलेंट वाद: अपूर्वा माखीजाची केली चौकशी