Kamini Kaushal : देशातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी त्रस्त होत्या.
Kamini Kaushal : देशातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या पहिल्या हिरोईन कामिनी कौशल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी त्रस्त होत्या. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, कामिनी कौशल यांचे कुटुंब खूप लो प्रोफाइल आहे आणि त्यांना प्रायव्हसी हवी आहे. कामिनी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री होत्या, ज्यांनी जवळपास ९ दशकं सिनेमांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे, निधनाच्या तीन वर्षांपूर्वीच त्यांचा शेवटचा सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' आला होता, ज्यात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या सिनेमात त्यांनी कॅमिओ केला होता.
धर्मेंद्र यांच्या पहिल्या को-स्टार होत्या कामिनी कौशल
कामिनी कौशल यांनी 'इश्क पे जोर नहीं' सारख्या सिनेमांमध्ये धर्मेंद्रसोबत काम केले होते. काही वर्षांपूर्वी धर्मेंद्र यांनी कामिनी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल इंस्टाग्रामवर लिहिले होते, "पहिल्या सिनेमा 'शहीद'ची हिरोईन कामिनी कौशलसोबतच्या पहिल्या भेटीचा फोटो. दोघांच्या चेहऱ्यावर निरागसता... एक प्रेमळ ओळख."
कामिनी कौशल यांनी किती सिनेमांमध्ये काम केले होते?
रिपोर्ट्सनुसार, कामिनी कौशल यांनी ९ दशकांच्या करिअरमध्ये जवळपास ९० सिनेमांमध्ये काम केले होते. त्यांच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये 'नीचा नगर' (१९४६), 'दो भाई' (१९४७), 'शहीद' (१९४८), 'नदिया के पार' (१९४८), 'बडे सरकार' (१९५७), 'शहीद' (१९६५), 'उपकार' (१९६७), 'पूर्व और पश्चिम' (१९७०), 'संतोष' (१९८९), 'चेन्नई एक्सप्रेस' (२०१३) आणि 'कबीर सिंह' (२०१९) यांचा समावेश आहे.

