प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्यातील अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली होती, ज्यामुळे अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे. ती तिच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळं चर्चेत आली होती. प्रियांका आणि अक्षय दोघांमध्ये अनेक वर्ष अफेअर होत आणि त्याच्या चर्चा या न्यूजमधून कायमच सुरु असायच्या. दोघेही एकत्र काम करणार होते आणि त्यांनी त्या चित्रपटासाठी शूटिंग केलं होत.
बरसात चित्रपटात करणार होते काम
दोघेही बरसात या चित्रपटात एकत्र काम करणार होते. त्यांनी या चित्रपटासाठी एक शूटिंग पूर्ण केलं होत. त्या दोघांनी मिळून एक गाणं शूट केलं होत, यातच दोघांचे अफेअर सुरु असल्याची माहिती अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिला कळली आणि अक्षयने हा चित्रपट करायला नकार दिला. त्यानंतर मात्र अक्षय कुमारची बांबेरी उडाली होती.
नेमकं काय झालं? -
सुनील आणि अक्षय या दोघांनी मिळून ७ चित्रपटांमध्ये काम केलं होत. अक्षय आणि प्रियांका हे दोघेही एका चित्रपटात काम करणार होते. पण त्यावेळी त्या गोष्टीचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडत असल्यामुळं त्यानं या चित्रपटात तो किंवा प्रियांका दोघांपैकी एकजणचकाम करेल असं तो म्हटला. त्यानंतर अभिनेता सुनील चकित झाला होता.
अक्षयने दिला नकार
अक्षयने हा पर्याय का सुचवला असं विचारल्यावर सुनील यांनी म्हटलं की, प्रियांका चोप्रासोबत काम करायला अक्षय कुमार इच्छुक नव्हता असं नाही पण त्या चित्रपट करण्यामुळं अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होणार होता. सुनील दर्शन यांनी ट्विंकलने या अफेअरची माहिती समजल्यानंतर अक्षयला सोडून देण्याचा निर्णय घेतला होता असं म्हटलं आहे.
