सार

Salman Khan Tiger 3 Trailer : सलमान खानचा बहुप्रतीक्षित- बहुचर्चित सिनेमा ‘टायगर - 3’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या ‘टायगर 3’ सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्माने केले आहे.

 

Salman Khan Tiger 3 Trailer : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katria Kaif) यांचा बहुप्रतीक्षित व बहुचर्चित सिनेमा ‘टायगर 3’ (Tiger 3) सिनेमाचा ट्रेलर (Tiger 3 trailer Out News) रिलीज करण्यात आला आहे. 

या ट्रेलरमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत केवळ अ‍ॅक्शनच पाहायला मिळत आहे. धमाकेदार ट्रेलरमध्ये एकापेक्षा एक संवादही ऐकायला मिळत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ट्रेलर रिलीजसोबत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही प्रेक्षकांना सांगण्यात आली आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ सिनेमा (Tiger 3 Movie Release Date) दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सलमान-कतरिनाच्या जोडीची जादू

ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. मोठ्या पडद्यावर सलमान खान (टायगर) (Tiger 3 trailer: Salman Khan's action drama) आणि कतरिनाची (झोया) जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या अ‍ॅक्शनपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान शस्त्रास्त्रधारी शत्रूंसोबत लढताना तसंच मशीन गन चालवताना दिसत आहे.

View post on Instagram
 

सलमान खानच्या Tiger 3चा ट्रेलर कसा आहे?

‘देश के अमन और देश के दुश्मन के बीच कितना फासला है, बस एक आदमी का।’ या जबरदस्त डायलॉगनंच सलमान खानचा आगामी सिनेमा ‘टायगर 3’च्या ट्रेलरची (Tiger 3 Trailer Live Updates) सुरुवात होत आहे. यानंतर लगेचच सलमानची धमाकेदार एण्ट्री दाखवण्यात आली आहे. 

सलमान आपल्या शत्रूंना जोरदार टक्कर देतानाही दिसतोय. ‘आतिषबाजी तुमने शुरू की,खत्म मैं करूंगा’, असे ट्रेलरमध्ये सलमानचे एकापेक्षा एक जबरदस्त डायलॉगही ऐकायला मिळताहेत.  कतरिना कैफचे (Tiger 3 Trailer : Salman Khan And Katrina Kaif In Spy Mode) देखील कमाल अ‍ॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत.

सिनेमामध्ये अभिनेता इमरान हाश्मी खलनायकाची (Salman Khan and Emraan Hashmi Tiger 3 trailer) भूमिका निभावत आहे. ट्रेलरमध्येही (Tiger 3 Trailer Salman Khan Katrina Kaif Emraan Hashmi) तो टायगरचा बदला घेण्यासाठी कट रचत असल्याचे आणि त्याला आव्हान देत असल्याचे दिसत आहे. 

दुसरीकडे ‘जब तक टाइगर मरा नहीं तब तक टाइगर हारा नहीं।’ सलमानच्या अशा जबरदस्त डायलॉगनं ट्रेलरचा शेवट करण्यात आला आहे.

VIDEO l Tiger 3 Trailer | Salman Khan, Katrina Kaif, Emraan Hashmi | Maneesh Sharma

Tiger 3 Trailer | Salman Khan, Katrina Kaif, Emraan Hashmi | Maneesh Sharma | YRF Spy Universe

Tiger 3 सिनेमा कधी होणार प्रदर्शित?

सलमान खानचा (Bollywood News In Marathi) आगामी सिनेमा ‘टायगर 3’ दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे येत्या 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमामध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. ‘टायगर 3’ सिनेमाचा ट्रेलर सलमानने आपल्या इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.  'टायगर -3' सिनेमा हिंदी भाषेव्यतिरिक्त तमिळ व तेलुगू भाषेतही रिलीज होणार असल्याची माहिती त्यानं आपल्या चाहत्यांना दिली आहे.

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Sam Bahadur Teaser Out : विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ सिनेमाचा टीझर पाहून अंगात संचारेल देशभक्ती

Animal New Song Hua Mai: रणबीर कपूरने 14 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत केले लिपलॉक, VIDEO VIRAL

2024मध्ये खिलाडी अक्षय कुमारचे 7 सिनेमे झळकणार BOX OFFICE वर