९० च्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्याने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये यश मिळवल्यानंतर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्या राय आणि रजनीकांत सारख्या कलाकारांसोबत काम केलेल्या या अभिनेत्याचे २००० नंतरचे चित्रपट फ्लॉप गेले.
बॉलिवूडमध्ये अनेक जणांना पटकन यश मिळालं आणि काही जणांना यश मिळवून छोटी मोठी नोकरी करत आहेत. एक ९०च्या दशकातील अभिनेता असून त्याने करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड यश मिळवलं होत. बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रचंड लोकप्रिय होते, पण नंतर त्यानं अभिनय सोडून तो टॅक्सी चालवायला लागला.
हा अभिनेता कोण आहे? -
हा अभिनेता दुसरा कोण नसून मिर्झा अब्बास अली आहे. या अभिनेत्यानं प्रसिद्ध लोकांसोबत काम केलं असून त्यानं ऐश्वर्या राय आणि रजनीकांत यांच्याबरोबर काम केलं होत. या अभिनेत्यानं ९०च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मिर्झा अब्बास यान अनेक हिंदी आणि साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनेत्याने 'अंश:द डेडली पार्ट' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्याचा हा चित्रपट फ्लॉप झाला असून हा चित्रपट पाहू नका असा सल्ला देण्यात आला होता.
२००० नंतर सगळे चित्रपट फ्लॉप गेले -
२००० नंतर मिर्झा अब्बास अली यांचे नंतरचे सगळे चित्रपट फ्लॉप गेले. त्यामुळं त्याच करिअर धोक्यात आलं. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण शेवटी त्याचे चित्रपट फ्लॉप जायला लागले. त्यानंतर तो न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आणि तिथं जाऊन टॅक्सी चालवायला लागला. त्याला कुटुंबाचं पालनपोषण करायचं असल्यामुळं त्यानं हा निर्णय घेतला होता.
आर्थिक समस्या वाढत गेल्या - ऐश्वर्या रायसोबत स्क्रीनवर रोमान्स करणारा हा अभिनेता नंतर रंक झाला होता. त्याला अनेकवेळा आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. एकेकाळी त्याच्याकडं भाडे आणि सिगारेट खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते. अभिनेत्याची परिस्थिती इतकी वाईट होती की त्याला पेट्रोल पंपवरच्या वॉशरूम वापरावं लागत होतं.