साऊथचा अक्षय कुमार म्हणून या अभिनेत्याची ओळख, छोट्या बजेटच्या चित्रपटातून कमावतो मोठी रक्कम ,जाणून घ्या मागील 5 चित्रपटांची कमाई किती ?

| Published : Apr 30 2024, 10:58 AM IST / Updated: Apr 30 2024, 11:00 AM IST

Ravi Teja, Tiger NageswaraRao
साऊथचा अक्षय कुमार म्हणून या अभिनेत्याची ओळख, छोट्या बजेटच्या चित्रपटातून कमावतो मोठी रक्कम ,जाणून घ्या मागील 5 चित्रपटांची कमाई किती ?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

हा साऊथ स्टार एकेकाळी राऊडी पोलिस बनला होता आणि आता तो साकारतोय मिस्टर बच्चनची भूमिका. रवी तेजाच्या शेवटच्या पाच चित्रपटांचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी जाणून घेऊया.

 

बॉलीवूडमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान सारखे स्टार्स वर्षातून एक-दोन चित्रपट करून बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करतात.तर दुसरीकडे अक्षय कुमार चार-पाच छोट्या बजेटचे चित्रपट करत असतो आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतो. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील असा एक स्टार आहे जो छोट्या बजेटच्या चित्रपटांचा मोठा राजा मानला जातो. ज्याचे चित्रपट प्रदर्शित होतात आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाईही करतात. त्याच्या शेवटच्या पाच चित्रपटांनी साऊथ फिल्म बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून रवी तेजा आहे.

कमी बजेट जास्त कमाई :

रवी तेजाच्या शेवटच्या पाच चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर हे सिद्ध होते की त्याचे दोन चित्रपट सुपरहिट होते, तर एक फ्लॉप ठरला आणि चौथ्याने सरासरी व्यवसाय केला. ईगलचा बॉक्स ऑफिसवरचा प्रवास अजूनही सुरूच आहे.रवी तेजा आणि चिरंजीवी यांच्या वॉल्टर वीरैया या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 140 कोटी रुपयांच्या बजेटसह 225.70 कोटी रुपयांची कमाई केली. धमाका या चित्रपटाने 110 कोटींची कमाई केली होती. त्याचे बजेट सुमारे 35 कोटी रुपये आहे.

रावणासूर चित्रपट ठरला फ्लॉप :

रावणासूर चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही आणि 50 कोटी रुपयांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 23 कोटी रुपये कमवू शकला. यापूर्वी रिलीज झालेल्या टायगर नागेश्वर रावने 48 कोटींची कमाई केली होती. त्याचे बजेट अंदाजे 35 कोटी रुपये होते. रवी तेजाच्या ईगल या चित्रपटाने २३ कोटींची कमाई केली होती. रुपये कमावले आहेत. त्याचे अंतिम आकडे येणे बाकी आहे.

साऊथ मधील सगळ्यात बिझी अभिनेता :

रवी तेजा हा एक दाक्षिणात्य अभिनेता आहे जो सतत व्यस्त असतो आणि चित्रपट घेऊन येत असतो. मिस्टर बच्चन हा त्याचा आगामी चित्रपट आहे. अशा प्रकारे मास महाराजा या नावाने ओळखला जाणारा अभिनेता नव्या स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा :

IPL बेकायदेशीर स्क्रीनिंग प्रकरणी तमन्ना भाटिया सायबर सेलसमोर गैरहजर, स्पष्टीकरणासाठी मागितला वेळ

नैराश्येला वैतागून लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेची गळफास घेऊन आत्महत्या