IPL बेकायदेशीर स्क्रीनिंग प्रकरणी तमन्ना भाटिया सायबर सेलसमोर गैरहजर, स्पष्टीकरणासाठी मागितला वेळ

| Published : Apr 29 2024, 03:20 PM IST

Tamannaah Bhatia
IPL बेकायदेशीर स्क्रीनिंग प्रकरणी तमन्ना भाटिया सायबर सेलसमोर गैरहजर, स्पष्टीकरणासाठी मागितला वेळ
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगचे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्या प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

आयपीएल कॉपी राइट प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटिया सोमवारी सायबर पोलिस कार्यालयात पोहोचली नाही. तिच्या वकिलाने सायबर पोलिसांना सांगितले की ती शूटिंगच्या संदर्भात बाहेर आहे आणि त्यामुळे आज येऊ शकत नाही. मात्र, सायबर पोलिसांनी तमन्नाच्या चौकशीसाठी अद्याप नवीन तारीख दिलेली नाही. वास्तविक, महादेव बेटिंग ॲप प्रकरणामुळे तमन्ना भाटियाला सायबर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. महादेव बेटिंग ॲपचे दुसरे ॲप फेअर प्ले 2024 च्या आयपीएलचे बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याचा आरोप आहे.

            अभिनेता साहिल खानला महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 40 तास ऑपरेशन केल्यानंतर शनिवारी छत्तीसगड येथून त्याला अटक केली. याशिवाय या प्रकरणात रॅपर बादशाहचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. याशिवाय गेल्या वर्षी या प्रकरणात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी करण्यात आली होती.

या प्रकरणी संजय दत्तलाही समन्स :

फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगचे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्या प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तलाही 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्या तारखेला भारतात नसल्याने तो चौकशीसाठी हजर राहू शकला नाही. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्याने सायबर सेलकडे आणखी वेळ मागितला आहे.

फेअरप्ले बेटिंग ॲप नेमकं आहे तरी काय?

फेअरप्ले हे एक बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे. ज्यावरून विविध प्रकारचे स्पोर्ट्स आणि एंटरटेन्मेंटशी संबंधित जुगार खेळला जातो. या ॲपच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फेअरप्लेवर क्रिकेट हा सर्वाधिक आवडता खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटवर सर्वाधिक सट्टा लावला जातो. त्यानंतर फुटबॉल आणि टेनिस यांना लोकांची पसंती आहे. या सर्व खेळांचे सामने फेअरप्लेवर थेट प्रक्षेपित केले जातात, जेणेकरून ॲपवर खेळाडूला सट्टेबाजी करणाऱ्याला एकाच वेळी खेळही पाहता येईल आणि रक्कमही जिंकता येईल. अशी या अँपची संकल्पना आहे.

आणखी वाचा :

फेअरप्ले ॲपवर बेकायदेशीरपणे आयपीएल मॅचेसचे स्ट्रीम केल्याप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स