2025 चे 6 सर्वात महागडे चित्रपट, जे ठरले सुपर डुपर फ्लॉप, 1100 कोटींचे नुकसान!
Six Most Expensive Disaster Films of 2025 : २०२५ मध्ये असे अनेक चित्रपट आले, ज्यांच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण जेव्हा ते प्रदर्शित झाले, तेव्हा निराशा झाली. जाणून घ्या मोठ्या बजेटच्या डिझास्टर चित्रपटांबद्दल.

गेम चेंजर
बजेट : जवळपास ४५० कोटी रुपये
भारतातील कमाई : सुमारे १३१.१७ कोटी रुपये
बॉक्स ऑफिस निकाल : डिझास्टर
एस. शंकर यांनी या तेलुगू अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात राम चरण, कियारा अडवाणी, अंजली आणि एस. जे. सूर्या हे कलाकार दिसले होते.
हरी हर वीरा मल्लू (Hari Hara Veera Mallu)
बजेट : जवळपास २५०-३०० कोटी रुपये
भारतातील कमाई : सुमारे ८७.१९ कोटी रुपये
बॉक्स ऑफिस निकाल : डिझास्टर
या ऐतिहासिक तेलुगू चित्रपटात पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत बॉबी देओल, निधी अग्रवाल, सत्यराज, नसर आणि ईश्वर राव हे कलाकारही दिसले होते.
विदामुयारची (Vidaamuyarchi)
बजेट : जवळपास २२५-३५० कोटी रुपये
भारतातील कमाई : सुमारे ८०.३५ कोटी रुपये
बॉक्स ऑफिस निकाल : डिझास्टर
या तमिळ अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन मगीझ थिरुमेनी यांनी केले होते. चित्रपटात अजित कुमार मुख्य भूमिकेत होता. त्यांच्यासोबत अर्जुन सर्जा, त्रिशा कृष्णन, रेजिना कॅसेंड्रा आणि जीवा रवी हे कलाकारही दिसले होते.
ठग लाइफ (Thug Life)
बजेट : जवळपास २००-३०० कोटी रुपये
भारतातील कमाई : सुमारे ४८ कोटी रुपये
बॉक्स ऑफिस निकाल : डिझास्टर
या गँगस्टर अॅक्शन ड्रामा तमिळ चित्रपटात कमल हासन मुख्य भूमिकेत होते. मणिरत्नम यांनी याचे दिग्दर्शन केले होते.
सिकंदर (Sikandar)
बजेट : जवळपास २०० कोटी रुपये
भारतातील कमाई : सुमारे ११०.१ कोटी रुपये
बॉक्स ऑफिस निकाल : डिझास्टर
या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना, सत्यराज आणि प्रतीक बब्बर हे कलाकारही दिसले होते. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले होते.
कन्नप्पा (Kannappa)
बजेट : जवळपास २०० कोटी रुपये
भारतातील कमाई : सुमारे ३३.०१ कोटी रुपये
बॉक्स ऑफिस निकाल : डिझास्टर
मुकेश कुमार सिंह दिग्दर्शित या तेलुगू पौराणिक चित्रपटात विष्णू मांचू, अक्षय कुमार, प्रभास, मोहनलाल असे मोठे कलाकार होते.
या ६ चित्रपटांचे एकूण बजेट १६०० कोटींपर्यंत होते, पण कमाई केवळ ४९० कोटी झाली. यामुळे निर्मात्यांना तब्बल १११० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

