MG Comet EV वर मिळतोय तब्बल 1 लाखांचा डिस्काऊंट, 55 पेक्षा जास्त मॉडर्न फिचर्स!
MG Comet EV Bumper Discount Save Up To 1 Lakh : भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV वर डिसेंबर २०२५ पर्यंत विशेष सूट जाहीर करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक १ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात. चला संपूर्ण तपशील पाहूया.

एमजी कॉमेट ईव्ही
भारतात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री खूप वेगाने वाढत आहे. नवीन EV खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, MG Comet EV वर डिसेंबर २०२५ पर्यंत विशेष सूट दिली जात आहे. या काळात कॉमेट ईव्ही खरेदी करणारे ग्राहक १ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. सवलतीचे तपशील शहर, डीलर आणि स्टॉकनुसार बदलू शकतात, त्यामुळे इच्छुकांनी अचूक माहितीसाठी जवळच्या शोरूमशी संपर्क साधावा.
230 किमी रेंज
पॉवरट्रेन आणि रेंज बोलायचे झाल्यास, एमजी कॉमेट ईव्ही 17.3 kWh बॅटरीसह येते. एका चार्जमध्ये ही कार 230 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यात 42 bhp पॉवर आणि 110 Nm टॉर्क देणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. 3.3 kW चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी सात तास लागतात. भारतात हे मॉडेल तीन व्हेरिएंट आणि पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.
कॉमेट ईव्हीचे फीचर्स
फीचर्सच्या बाबतीत, कॉमेट ईव्ही लहान असली तरी, ती टेक्नोलॉजीने परिपूर्ण आहे. यात एलईडी हेडलॅम्प आणि टेल लाईट्स, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto/Apple CarPlay) आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर आणि रिव्हर्स कॅमेरा यांसारखी 55 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्सही यात आहेत.
१ लाख रुपयांची बचत
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय बाजारात ही कार ७.५० लाख ते ९.५६ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत उपलब्ध आहे. तथापि, सवलतीची रक्कम राज्य, शहर, डीलरशिप आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते. त्यामुळे, वाहन खरेदी करण्यापूर्वी जवळच्या अधिकृत डीलरशी संपर्क साधून सवलत आणि ऑफर्सची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

