ये रिश्ता क्या कहलाता है' मधील नायरा पोस्ट शेअर करत म्हणाली, या सगळ्या अफवा...

| Published : May 03 2024, 01:56 PM IST / Updated: May 03 2024, 01:57 PM IST

shivangi joshi kushal tandon getting engaged

सार

काही वृत्तानुसार शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांनी बरसातें मालिकेच्या सेटवरच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. ते दोघे आता सिरिअस रिलेशनमध्ये आहेत आणि ते या नात्याला पुढच्या स्तरावर म्हणजेच लग्नाच्या दिशेने नेण्याचा विचार करत आहेत.

नवी दिल्ली: ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नायराची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या चर्चेत आहे.टीव्ही मालिका बरसातेंचा कोस्टार कुशल टंडनसोबत तिच्या नात्याच्या बातम्या येत आहेत. शिवांगी आणि तिचा बरसातें मौसम प्यार का सह-कलाकार कुशल टंडन एकमेकांना डेट करत आहेत. आता असे बोलले जात आहे की दोघांनी एंगेजमेंट केले असून त्यांची लग्नाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. 

काही वृत्तानुसार शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांनी बरसातें या मालिकेच्या सेटवरच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. असे म्हटले जात होते की ते दोघे आता सिरिअस रिलेशनमध्ये आहेत आणि ते या नात्याला पुढच्या स्तरावर म्हणजेच लग्नाच्या दिशेने नेण्याचा विचार करत आहेत. या चर्चाना काहीसा पूर्ण विराम मिळाला होता. मात्र आता परत दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत यातच अभिनेत्री शिवांगीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत म्हंटले आहे की,मला अफवा आवडतात. मी नेहमी माझ्याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी शोधत असते. यामध्ये अशा गोष्टी असतात ज्या मला देखील माहिती नसतात.

सर्वात मोठी बाब म्हणजे कुशल याधीही रिलेशनमध्ये होता. कुशल टंडन याआधी बिग बॉस 7 मध्ये गौहर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता.त्यानंतर दोघांनीही एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम देखील केले होते. तर 2014 मध्ये गौहर आणि कुशलने ब्रेक अप केले. तसं पाहिलं तर कुशल टंडन 39 वर्षाचा असून शिवांगी फक्त 25 वर्षाची आहे. वयाच्या फरकाबद्दल बोलायचे झाले तर दोघांमध्ये 14 वर्षांचे अंतर आहे.

आणखी वाचा :

"आम्ही दोघे..... म्हणत, अंकिता लोखंडेने पतीसोबतचे हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर

'हरी हर वीरा मल्लू'चा हिंदी टीझर रिलीज, बॉबी देओलची पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिका