"आम्ही दोघे..... म्हणत, अंकिता लोखंडेने पतीसोबतचे हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर

| Published : May 03 2024, 10:58 AM IST

ankita lokhande and husband at hospital

सार

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनसोबत हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आहे. जाणून घ्या का अंकिताला गाठावे लागले हॉस्पिटल? तसेच या फोटो अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. 

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबतचे हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आहेत. वास्तविक, हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फोटोंमध्ये हे जोडपे हॉस्पिटलच्या बेडवर एकत्र दिसत आहेत. इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, आजारपणात आणि तब्येती बाबतही एकत्र. खरंच.! या पोस्टनंतर, बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील चाहते आणि मित्रांनी कमेंटमध्ये त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

View post on Instagram
 

युविका चौधरी, निशा रावल, पूर्वा राणा मृदुला ओबेरॉय यांनी फोटोवर कमेंट करून दोघांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच वेळी, चाहत्यांनी टिप्पण्यांमध्ये लवकरच बरे व्हा लिहीत हार्ट इमोजी देखील कमेंट मध्ये पोस्ट केले आहेत.

अंकिता लोखंडेच्या कामाबद्दल :

अभिनेत्री रणदीप हुडा सोबत स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटामध्ये दिसली होती. तर आता ती आम्रपाली या वेब सीरिजमध्ये चित्रपट निर्माता संदीप सिंगसोबत काम करणार आहे, ज्यामध्ये अंकिता आम्रपालीची भूमिका साकारणार आहे.

अंकिता लोखंदेबद्दलच्या अफवा :

अंकिता लोखंडेने करण जोहरची स्टुडंट ऑफ द इयर 3 ही मालिका नाकारल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. यावर अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या बातम्या केवळ अफवा असून त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील नात्याबद्दल :

विकी आणि अंकिता यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये विकी आणि अंकिता यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

आणखी वाचा :

'हरी हर वीरा मल्लू'चा हिंदी टीझर रिलीज, बॉबी देओलची पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिका

मोठी बातमी! सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या एका आरोपीचा उपचार दरम्यान मृत्यू ;आत्महत्येचा केला होता प्रयत्न