सार

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षितेत अधिक वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर उच्च स्तरावरील सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. अशातच कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर उभे राहणे किंवा फोटो काढण्याची परवानगी नाही.

Salman Khan Y Level Security : बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. अजित पवारांच्या गटातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर 12 ऑक्टोबरला वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांचे उत्तम नातेसंबंध होते. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म फेसबुकवर लॉरेंस बिश्नोईने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, लॉरेंस बिश्नोईची टोळी दीर्घकाळापासून सलमान खानच्या हत्येचा कट रचत आहे. अशातच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या सुरक्षितेत अधिक वाढ करण्यात आली आहे.

सलमानच्या घराबाहेर उच्च स्तरावरील सुरक्षा
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा अधिक वाढवली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टारचे निवासस्थान गॅलेक्सी बाहेरील मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे सलमानच्या चाहत्यांना किंवा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या निवासस्थानाबाहेर थांबणे किंवा फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मीडियालाही सलमानच्या घराबाहेर शूट करण्यास परवानगी नाही. गॅलेक्सी बाहेर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे.

सलमानला Y स्तरावरील सुरक्षा प्रदान
सलमान खानला Y स्तरावरील सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. एक एस्कॉर्ट गाडी नेहमीच सलमान खानच्या कारच्या मागे असते. एसआरपीएफला गॅलेक्सी आणि पनवेल येथील फार्महाउस बाहेर तैनात करण्यात आले आहे. याशिवाय सलमान खानने आपल्या सर्व मिटिंग्स रद्द केल्या आहेत. याशिवाय बॉलिवूडमधील कलाकारांनी भेटण्यास येऊ नये अशी विनंतीही सलमानने केली आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल…
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या आगामी सिनेमा ‘सिकंदर’ची शूटिंग करत आहे. सिनेमात सलमानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. सिकंदर सिनेमा वर्ष 2025 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. सध्या सलमान खान बिग बॉस सीजन 18 चे सुत्रसंचालन करत आहे. सलमान खान लवकरच ‘टायर वर्सेस पठाण’, ‘किक-2’, ‘दबंग-4’, ‘बिग बुल’, ‘बब्बर शेर’ या सिनेमात झळकणार आहे.

आणखी वाचा : 

बाबा सिद्दीकी प्रकरणापासून शाहरुख खान का राहिला दूर, काय आहे कारण?

बॉलिवूडमधील ३ तर कोणी केले ४ लग्न, एकजण ७० व्या वर्षी बनला नवरदेव