मुलीचा आंनद पाहून आईला अश्रू अनावर ! सई ताम्हणकरने खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार

| Published : Apr 09 2024, 09:24 PM IST

sai tamhankar

सार

गुढीपाडवा हा अत्यंत महत्वाचा शुभ दिन मानला जातो. साडेतीन मुहूतापैकी एक असलेल्या शुभदिवशी सई ताम्हणकरने आलिशान गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ कंपनीची नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे.

गुढीपाडवा हा अत्यंत महत्वाचा शुभ दिन मानला जातो. साडेतीन मुहूतापैकी एक असलेल्या शुभदिवशी सई ताम्हणकरने आलिशान गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ कंपनीची नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे. यावेळी अभिनेत्रीचे कुटुंबीय आणि आई उपस्थित होती. लेकीचा आनंद पाहून आई देखील भारावून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांत मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात अभिनेत्री सई ताम्हणकरने दबदबा निर्माण केला आहे. स्वप्न पाहिली आणि त्यासाठी अपार मेहनत केली की, आपली स्वप्न सत्यात उतरतात असंच काहीसं सईबरोबर झालं आहे. २०२४ हे वर्ष तिच्यासाठी सर्वार्थाने खास ठरत आहे. सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून सईची आणखी एक स्वप्नपूर्ती झाली आहे.

View post on Instagram
 

सईचे सुरुवातीचे दिवस :

सई ताम्हणकरने सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत तिने आलिशान घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता अभिनेत्रीच्या घरी ही आलिशान गाडी आल्याने सध्या नेटकऱ्यांसह कलाकार मंडळी सईवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. “तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही हे कोणालाही सांगू नका. स्वप्न पाहा, ते साध्य करा अन् ते स्वप्न जगा!” असं कॅप्शन देत सईने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सईचे आगामी प्रोजेक्ट :

दरम्यान, ‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘भक्षक’नंतर आता येत्या काळात सई ‘डब्बा कार्टल’, ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’ अशा वैविध्यपूर्ण प्रोजेक्टमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

आणखी वाचा :

Bigg Boss OTT 3: लवकरच 'बिग बॉस ओटीटी ३' प्रेक्षकांच्या भेटीला; कधीपासून सुरू होतोय शो? वाचा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळ लवकरच होणार मोठी ताई,मायराच्या आईने दिली गोड बातमी !

Pushpa 2 चा धडाकेबाज Teaser प्रदर्शित, अल्लू अर्जुनचा लुक बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज (Watch)