‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळ लवकरच होणार मोठी ताई,मायराच्या आईने दिली गोड बातमी !

| Published : Apr 09 2024, 05:26 PM IST / Updated: Apr 09 2024, 05:28 PM IST

mayra

सार

माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा वायकुळ लवकरच मोठी ताई होणार असून मायराच्या आईने दिलीय गोड बातमी. याबाबद्दलचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ नेहमी चर्चेत असते.मायरा वायकुळच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत; ज्यामधून आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फोटोमध्ये मायराच्या हातात पाटी दिसत आहे, ज्यावर लिहिलं आहे, ‘माझ्याकडे एक गुपित आहे.’ दुसऱ्या फोटोमध्ये मायरा आणि तिचे आई-वडील पाहायला मिळत आहेत. या फोटोतील पाटीवर लिहिलं आहे, ‘मी आता लवकरच मोठी बहीण होणार आहे.’ तिसऱ्या फोटोमधून वायकुळ कुटुंबात गोंडस बाळाचं आगमन कधी होणार, तो महिना जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२४मध्ये मायराच्या घरी पाळणा हलणार आहे आणि मायरा मोठी ताई होणार आहे.

View post on Instagram
 

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय बालकलाकारांपैकी मायरा एक आहे. लहान वयातच तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आता मायराने सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. तिचा पहिला-वहिला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ लवकरच भेटीस येणार आहे. अशातच मायराने एक आनंदाची बातमी दिली आहे.

या मालिकांमध्ये होती मायरा :

मायराने दिलेली ही आनंदाची बातमी वाचून नेटकरी तिचे आई-बाबा श्वेता व गौरव वायकुळ यांना शुभेच्छा देत आहेत. मायराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.दरम्यान, मायराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती. आता तिचा पहिला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आणखी वाचा :

Snake Venom Case : सापांसाठी वर्च्युअल क्रमांकावरून कॉल करायचा एल्विश यादव, पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे

Pushpa 2 चा धडाकेबाज Teaser प्रदर्शित, अल्लू अर्जुनचा लुक बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज (Watch)

रामायण चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटातील भूमिकांसाठी रणबीर कपूर आणि यशने घेतलेली फी ऐकून व्हाल थक्क