सार

साउथची लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीचा 'अप्‍सरा आली' या मराठी गाण्यावरील डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर याआधी सोनाली कुलकर्णीने देखील डान्स केला होता.

दाक्षिणात्य अभिनेते आणि अभिनेत्री हे त्यांच्या स्थानिक चित्रपटसृष्टीत चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं दिसून येत. यामध्ये सर्वात आघाडीवरच नाव म्हणून साई पल्लवी या अभिनेत्रीला ओळखले जाते. ती तिच्या सौंदर्यामुळे आणि सोशल मीडियावरील वावराने प्रसिद्ध असल्याचे दिसून आले आहे. आता ती परत एकदा चर्चेत आली असून यावेळीचा विषय हा तिने मराठी गाण्यावर केलेलं नृत्य आहे.

अप्सरा गाण्यावर थिरकली साई पल्लवी - 
अभिनेत्री साई पल्लवी ही अप्सरा आली या गाण्यावर नाचताना दिसून आली आहे. तिने या गाण्यावर नृत्य केले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारी अप्सरा आली या लावणीवर तिने नृत्य केले आहे. या गाण्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने डान्स केलेला असून ते यु ट्यूबवर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. 

साई पल्लवीचा हा कार्यक्रम बारामती शहरात भरवण्यात आला होता, अशी सूत्रांकडून माहिती समजली आहे. सध्याच्या काळात अनेक अभिनेत्री या वेस्टर्न प्रकाराकडे जात असताना वतीने केलेलं नृत्य हे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं आहे. 
आणखी वाचा - 
श्री गणेशाच्या मुलांची नावे काय आहेत, त्यांच्या कुटुंबात किती सदस्य आहेत?