सार
Ramayana Part- 1 : बॉलिवूडमधील अभिनेता रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा आगामी सिनेमा रामायण भाग- 1 सातत्याने चर्चेत आहे. कधी सिनेमाचा सेट तर कधी कलाकारांच्या लुकचे फोटो लीक होतात. अशातच सिनेमाचे बजेट समो आले आहे.
Ramayana Part- 1 Movie : सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सर्वत्र लाइमलाइटमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीरचे रामायण सिनेमाच्या सेटवरील काही फोटो समोर आले होते. अशातच सिनेमाचे बजेट किती असणार याची माहिती समोर आलीय. नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला रामायण भाग-1 सिनेमा भारतातील सर्वाधिक महागडा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे.
रामायण सिनेमाचे बजेट
रामायण भाग-1 सिनेमाचे बजेट 100 मिलियन युएसडी असणार आहे. भारतीय चलनात सिनेमाचे बजेट 835 कोटी रुपये होते. एवढ्या बजेटमध्ये काही 'गदर' सिनेमे तयार होतील. खरंतर, सिनेमाची फ्रेंचायजी वाढल्यास बजेटही वाढले जाईल असे बोलले जातेय.
ब्रम्हास्र सिनेमाचे बजेट
रणबीर कपूरचा वर्ष 2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ब्रम्हास्र’ सिनेमाचे बजेट 450 कोटी रुपये होते. खरंतर, ब्रम्हास्र सिनेमा हिंदीतील महागड्या सिनेमांपैकी एक होता. याशिवाय आता ‘रामायण’ रणबीरचा दुसरा सर्वाधिक महागडा सिनेमा आहे. या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनसाठी 600 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
ना पठाण, ना पुष्पाचे बजेट
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ सिनेमाचे बजेट 240 कोटी रुपये होते. तर ‘जवान’ सिनेमाचे बजेट 370 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते. याशिवाय जवानचे बजेट 370 कोटी रुपयांपर्यंत होते. ‘पुष्पा- 2’ सिनेमाचे बजेट 500 कोटी रुपये होते असल्याचे समोर आले होते.
आणखी वाचा :
तब्बूची अमेरिकन टीव्ही सीरिजमध्ये एण्ट्री, मिळाला हा मोठा प्रोजेक्ट