राजकुमार रावने चाहत्यांना दिली गोड बातमी, वाचून म्हणाल पेढे कधी देणार?
अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच पत्रलेखाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राजकुमारने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली असून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राजकुमार रावने चाहत्यांना दिली गोड बातमी, वाचून म्हणाल पेढे कधी देणार?
राजकुमार राव हा इंडस्ट्रीतील एक असाधारण कलाकार आहे. काही दिवसांपूर्वी कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल-कतरीना कैफ या कलाकारांनी काही दिवसांपूर्वी गुड न्यूज दिली आहे.
राजकुमार रावने दिली गुड न्यूज
राजकुमार रावने काही दिवसांपूर्वी गोड बातमी दिली आहे. तो बाप झाला असून त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानं याबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली.
दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दिली गोड बातमी
दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी गोड बातमी दिली आहे. १५ नोव्हेंबर रोजी शनिवारी त्यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. यावेळी राजकुमार रावने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
राजकुमार राव काय म्हणाला?
राजकुमार रावने यावेळी बोलताना आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. आमच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्याकडे लक्ष्मीचे आगमन झालं आहे. हे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच देवाण दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे.
राजकुमार आणि पत्रलेखा यांनी कधी केलं लग्न?
राजकुमार आणि पत्रलेखा यांनी १५ नोंव्हेंबर २०२१ रोजी लग्न केलं होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आम्ही आई बाबा होणार असल्याची बातमी दिली होती. लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांना कन्या झाली आहे.
चाहत्यांनी शुभेच्छांचा केला वर्षाव
चाहत्यांनी यावेळी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली आहे. दोघांना इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्याचं दिसून आलं.

