- Home
- Entertainment
- Coolie Vs War 2 Box Office Collection Day 4 : दोन्ही चित्रपटांची लॉन्ग विकेंडमधील कमाई किती झाली? कोण ठरला सरस?
Coolie Vs War 2 Box Office Collection Day 4 : दोन्ही चित्रपटांची लॉन्ग विकेंडमधील कमाई किती झाली? कोण ठरला सरस?
मुंबई - १४ ऑगस्टला रिलीज झालेल्या 'वॉर २' आणि 'कुली' या दोन मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या कमाईत सतत घट होत आहे. रविवारीही, म्हणजेच चौथ्या दिवशीही, या चित्रपटांना अपेक्षित वाढ मिळाली नाही. दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली ते जाणून घ्या...

चौथ्या दिवशी 'वॉर 2' चे कलेक्शन
ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर २' ला रविवारी अपेक्षित उसळी मिळाली नाही. चित्रपटाचे कलेक्शन वाढण्याऐवजी कमी झाले. रविवारी या चित्रपटाने सुमारे २८.१८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. लॉन्ग विकेंडमधील या चित्रपटाचे हे सर्वात कमी कलेक्शन होते.
'वॉर 2' चे एकूण कलेक्शन किती?
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर २' ने पहिल्या दिवशी ५२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५७.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.२५ कोटी कमावले. चौथ्या दिवसाच्या कलेक्शननंतर, चित्रपटाचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन १७०.७८ कोटी रुपये झाले आहे. आता पाहणे हे आहे की पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचे कलेक्शन कुठे जाऊन थांबते.
हेही वाचा : Maharashtra Weather Alert: पावसाचा कहर, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'
'कुली' ने चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
रजनीकांत स्टारर 'कुली'ची कमाई चौथ्या दिवशी घटून ३० कोटींच्या आसपास पोहोचली. रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. रविवारी चित्रपटाने सुमारे २८.९५ कोटी रुपयांची कमाई केली.
हेही वाचा : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास उमेदवारांसाठी 2,418 पदांची भरती सुरू!
'कुली' चे भारतातील एकूण कलेक्शन किती?
'कुली' आणि 'वॉर 2' चे वर्ल्डवाइड कलेक्शन
कुलीचे १ हजार कोटींची स्वप्न तसेच राहणार?
रजनीकांत यांचा कुली रिलीज झाला तेव्हा प्रचंड महोल तयार झाला होता. हा चित्रपट १ हजार कोटींची मजल मारेल असे सांगितले जात होते. त्यासाठी तशी वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. पण चित्रपट अपेक्षांवर उतरला नाही. या चित्रपटाने इतरांचे रेकॉर्ड मोडले असले तरी १ हजार कोटी हे स्वप्नच राहणार असे दिसते.
वॉर २ चे पद्धतशीर नियोजन
कुली या चित्रपटासोबत वॉर २ रिलिज करण्यात आला होता. या चित्रपटाने कुलीच्या कमाईचा बराचसा हिस्सा आपल्या नावावर केला. या चित्रपात हृतिक रोशनसोबत ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा हिरो होता. त्यामुळे या चित्रपटाला दक्षिण भारतातही प्रामुख्याने तेलुगुत मोठी कमाई करता आली.
