१ कप साबुदाणा, १/२ कप शेंगदाण्याचा कूट, २-३ हिरव्या मिरच्या, २ मध्यम आकाराचे बटाटे, २ टेबलस्पून तूप, सेंधा मीठ चवीनुसार, थोडी साखर, कोथिंबीर सजावटीसाठी
साबुदाणा नीट धुऊन ५-६ तास किंवा रात्रीभर पाण्यात भिजत ठेवा. पाणी फक्त साबुदाण्याच्या वरच्या पातळीपर्यंतच असावं.
कढईत तूप गरम करून हिरव्या मिरच्या परता. नंतर बटाटे टाकून ते मऊ होईपर्यंत शिजवा.
भिजवलेला साबुदाणा, सेंधा मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट घाला. हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून दाणे मोडणार नाहीत.
झाकण ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटं वाफवून घ्या. साबुदाण्याचे दाणे पारदर्शक दिसू लागले की खिचडी तयार आहे.
वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व्ह करा. चवीसाठी लिंबाचा रसही घालू शकता.
साबुदाना खिचडीसाठी साबुदाना भीजत टाकताना त्यात जास्त पाणी घालू नका. साबुदाना असेल तेवढेच पाणी घाला. साबुदाना छान भिजतो.
साबुदाना खिडची कढईत बनवा. इतर भाड्यांमध्ये बनवू नका. तसेच गॅसवर वाफवताना जास्त हलवू नका. नाहीतर साबुदाना विस्कळीत होतो. तसेच हलवताना हळूवार हलवा. नाहीतर फुटतोही.
साबुदाना खिचडी सर्व्ह करताना सोबत साखर किंवा गुळ घातलेले दही खायला द्या. त्यामुळे खिचडीची चव आणखी छान लागते. तसेच तुम्ही घाईत खात असाल तर खिचडी घशात अडकत नाही.
साबुदाना खिचडी केवळ उपवासाला खावी असे काही नाही. तुम्ही इतर दिवसही तिचा आस्वाद घेऊ शकता. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये तर ठेल्यांवरही खिचडी मिळते.
साबुदाना खिचडी खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका. नाहीतर पोट अगदी गच्च झाल्यासारखे होते. जरा वेळा जाऊ द्या. त्यानंतर थोडे आणि त्यानंतर जरा जास्त पाणी प्या. पोटाचा त्रास होणार नाही.