२ कप तांदळाचे पीठ, २ कप पाणी, १ चमचा तूप, चिमूटभर मीठ, १ कप किसलेला नारळ, १ कप गूळ, २ चमचे खसखस, १ चमचा तूप, वेलची पूड
कढईत तूप गरम करा. खसखस थोडीशी भाजून घ्या. नारळ, गूळ घालून हलवत शिजवा. वेलची पूड टाकून सारण थंड होऊ द्या.
पाणी, तूप, मीठ उकळा. तांदळाचे पीठ घालून नीट ढवळा. झाकून ५ मिनिटे ठेवून मळून घ्या.
उकडीचे छोटे गोळे करा. हाताला थोडे तूप लावून पातळ पोळी सारखा आकार द्या. मध्ये सारण भरून कडांना पळ्या पाडा. वरून बंद करून मोदकाचा आकार द्या.
मोदक वाफेच्या पात्रात ठेवा. १०-१२ मिनिटे वाफवा. तयार मोदकावर तूप ओता आणि गरम सर्व्ह करा
हाताला पाणी किंवा तूप लावल्याने मोदक फाटत नाहीत. गुळाचा पाक घट्ट करू नका, नाहीतर सारण कठीण होते.
रक्षाबंधनासाठी स्पेशल 5 मेहंदी डिझाइन्स, नात्यातील वाढेल प्रेम
रक्षाबंधनावेळी शेवटच्या मिनिटांला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 5 Ideas
Independence Day : स्वातंत्र्य दिनानिमित्त नेसा या साड्या, खुलेल लूक
घरीच पार्लरसारखं फेशियल कस करावं, प्रोसेस जाणून घ्या