MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Alert: पावसाचा कहर, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'

Maharashtra Weather Alert: पावसाचा कहर, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'

Maharashtra Weather Alert: श्रावण महिन्यात पावसाने चांगलाच जोर पकडला असून, अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा जारी केला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Aug 17 2025, 09:29 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Image Credit : Asianet News

मुंबई : श्रावणाच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही भागातील शेतकरी अजूनही पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता पुन्हा वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यापैकी 5 जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' आणि 11 जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

Heavy to Very Heavy rainfall with extremely Heavy rainfall very likely to occur at isolated places in Ghats areas of Madhya Maharashtra.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/7400Bbp2rk

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 17, 2025

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
Image Credit : ANI

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रेड आणि ऑरेंज अलर्ट

मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथेही 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने 'यलो अलर्ट' आहे.

Related Articles

Related image1
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी, कोकण किनारपट्टीवर होणार चांगला पाऊस
Related image2
रविवारच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला?
35
Image Credit : ANI

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित असल्याने 'यलो अलर्ट' आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' असून, या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यासाठी मात्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

45
Image Credit : Getty

विदर्भातही पावसाचा तडाखा

विदर्भातील नागपूर, अकोला, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

55
Image Credit : Getty

नागरिकांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Recommended image2
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Recommended image3
कोकण रेल्वेचा पावसाळ्यापूर्वी सेफ्टी मोड ऑन! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर प्री-मान्सून कामे सुरू
Recommended image4
Maharashtra Board Exam : दहावी-बारावी परीक्षेत मोठा बदल; उत्तरपत्रिकांचे होणार ऑनस्क्रीन मूल्यांकन
Recommended image5
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी?
Related Stories
Recommended image1
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी, कोकण किनारपट्टीवर होणार चांगला पाऊस
Recommended image2
रविवारच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved