Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Tie The Knot : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी अखेर लग्नगाठ बांधली आहे. 

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Tie The Knot : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय जोडी, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा, आता अधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो काही क्षणांतच इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. हे लग्न दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा संगम ठरलं. २६ फेब्रुवारीला सकाळी १०:१० वाजता विजयच्या पारंपरिक तेलुगू पद्धतीने लग्न झालं. त्यानंतर संध्याकाळी रश्मिकाच्या मूळच्या कोडागु पद्धतीनुसार दुसरा विवाहसोहळा पार पडला.

मंडपात रश्मिका झाली भावुक!

विजय देवरकोंडाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, मंगळसूत्र बांधण्याच्या क्षणी रश्मिका भावुक होऊन रडताना दिसत आहे. तिच्या डोळ्यातील हे आनंदाश्रू पाहून दोघांमधील घट्ट प्रेम दिसून येतंय. हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत.

विजय देवरकोंडाची हृदयस्पर्शी पोस्ट

विजयने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलं, "एक दिवस मला तिची खूप आठवण आली. ती सोबत असती तर माझा दिवस आणखी चांगला गेला असता, ती समोर बसली असती तर माझ्या जेवणाला एक अर्थ आला असता, असं मला वाटलं. माझ्या आयुष्यात शांतता आणि घराची भावना देण्यासाठी ती हवीच, हे मला जाणवलं. म्हणून, मी माझ्या बेस्ट फ्रेंडला माझी बायको बनवलं. 26.02.2026."

View post on Instagram

'माझे पती' म्हणत रश्मिकाने करून दिली ओळख

रश्मिकानेही एक मोठी पोस्ट लिहित म्हटलं, "हॅलो माझ्या प्रिय चाहत्यांनो, मी तुम्हाला माझे पती विजय देवरकोंडा यांची ओळख करून देत आहे! ज्या व्यक्तीने मला खरं प्रेम आणि शांतता म्हणजे काय हे शिकवलं. मोठी स्वप्नं पाहणं चुकीचं नाही, असं ते मला रोज सांगतात आणि माझ्या क्षमतेची आठवण करून देतात. मी त्यांच्यावर एक पुस्तक लिहू शकेन!"

View post on Instagram

शाही थाट आणि पाहुणचार

हे लग्न राजस्थानमधील उदयपूरपासून ५० किमी अंतरावर असलेल्या आलिशान ITC Mementoes हॉटेलमध्ये झालं. या जोडप्याने तिथे उपस्थित असलेल्या मीडियाला (पापाराझी) मिठाई वाटून आनंद साजरा केला.