सार

अभिनेत्री राधिका आपटेला बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल 2024 ला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने बेबी बंप फ्लॉन्ट करत गुडन्यूज दिली आहे.

Radhika Apte Pregnancy Good News : राधिका आपटेला नुकतेच बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये स्पॉट करण्यात आले. यावेळी अभिनेत्री राधिका आपटेने बेबी बंप फ्लॉन्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. पहिल्यांदाच बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे काही फोटो राधिका आपटेने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. खरंतर, राधिका आपटे तिचा आगामी सिनेमा सिस्टर मिडनाइटच्या युकेमधील प्रिमीयरसाठी आली होती.

राधिका आपटेचा लूक
राधिका आपटेने बेबी फ्लॉन्ट करताना काळ्या रंगातील ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. यामध्ये राधिका अतिशय सुंदर दिसत होती. राधिकाने इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

View post on Instagram
 

युजर्सच्या प्रतिक्रिया
एका युजरने म्हटले की, “ओमएजी, ती प्रेग्नेंट आहे, किती उत्सुकतेची बाब आहे." दुसऱ्याने म्हटले की, “प्रीमियरसाठी आणि तुझ्या प्रेग्नेंसीसाठी अभिनंदन.” याशिवाय अमेरिकन अभिनेत्री आणि लेखिका सारा मेगन थॉमसनेही राधिका आपटेला शुभेच्छा दिल्या आहेत. साराने म्हटले की, “राधिका अभिनंदन! तू खूप सुंदर दिसतेय.” याशिवाय निर्माता गुनित मोंगानेही राधिकाला येणाऱ्या बाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राधिकाचा विवाह
राधिका आपटेने ब्रिटिश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलर (Benedict Taylor) याच्यासोबत विवाह केला आहे. कपल वर्ष 2012 पासून एकमेकांसोबत आहेत. या दोघांचे लग्न नॉर्थ इंग्लंडमध्ये खासगी स्वरुपात पार पडले होते. कपलने अन्य कलाकारांसारखे सोशल मीडियावर प्रेग्नेंसीची गूड न्यूज शेअर न करण्याचे ठरवले होते. खरंतर, राधिका आपटेने नेहमीच आपल्या पतीसोबतचे नाते खासगी स्वरुपाचे ठेवले आहे. या दोघांकडूनही एकमेकांचे फारसे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात नाहीत.

आणखी वाचा : 

केवळ 50 सेकंदाच्या शूटसाठी 5 कोटी रुपये घेते? वाचा कोण आहे 'ती' अभिनेत्री

सलमान खानसाठी उच्च स्तरावरील सुरक्षा प्रदान, चाहत्यांना सेल्फी काढण्यासही बंदी