सार

सिनेसृष्टीतील अशी एक अभिनेत्री आहे जी केवळ 50 सेकंदाच्या शूटसाठी तब्बल 5 कोटी रुपये फी वसूल करते. या अभिनेत्रीने आतापर्यंत रजनीकांत, शाहरुख खान आणि नागार्जुनसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.

Most Expensive Actress in India : भारतातील सर्वाधिक महागडी अभिनेत्री कोण? ही अभिनेत्री एका जाहिरातीच्या केवळ 50 सेकंदासाठी तब्बल पाच कोटी रुपयांची फी वसूल करते. खरंतर, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा किंवा ऐश्वर्या राय यांना देखील या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. या अभिनेत्रीने नुकत्याच एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये वसूल केल्याची जोरदार चर्चा आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?
रजनीकांत, शाहरुख खान, जयराम आणि शाहरुख खानसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलेली अभिनेत्री दुसरी कोणी नसून नयनतारा आहे. नयनताराचे दक्षिण भारतात आलिशान घर आहे. वर्ष 2018 च्या फोर्ब्स इंडियाच्या 'सेलिब्रेटी 100' च्या लिस्टमध्ये नयनताराचे नाव होते. फोर्ब्सच्या लिस्टमधील नयनतारा एकमेव दाक्षिणात्य अभिनेत्री ठरली होती.

नयनताराचे शिक्षण ते करियर
20 वर्षांमध्ये अभिनेत्री नयनताराने 80 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. काही सिनेमांसाठी नयनताराला पुरस्काराही मिळाले आहेत. सुरुवातीला अभिनेत्री होण्याची नयनताराची इच्छा नव्हती. तिला एका चार्टड अकाउंट व्हायचे होते. याआधी नयनताराने इंग्रजी साहित्यात डिग्री मिळवली आणि नंतर सीए होण्यावर लक्ष केंद्रित केले. पण अखेर नयनताराने आपल्या मनाचे ऐकले आणि सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.

एक काळ असा होता की, नयनताराचे करियर संपल्याचे बोलले जात होते. पण अत्यंत कौशल्याने नयनताराने पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. आता दाक्षिणात्य सिनेमातील सर्वाधिक सुंदर आणि दमदार अभिनेत्रींपैकी एक नयनतारा मानली जाते. बड्या कलाकारांसोबत आता नयनतारा सिनेमांमध्ये झळकताना दिसतेय.

नयनताराचे अफेअर
करियरच्या सुरुवातीला नयनताराचे नाव सिम्बु/सिलम्बरासन याला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. वर्श 2006 मध्ये वल्लवन सिनेमाच्या सेटवर दोघे एकमेकांसोबत फ्लर्ट करताना अनेकदा दिसले होते. पण काही महिन्यानंतर विभक्त झाले. याशिवाय दोघांचे फोटोही लीक झाले होते. यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता.

यानंतर अभिनेता प्रभुदेवाला साडेतीन वर्ष डेट केले. वर्ष 2009 मध्ये प्रभुदेवा आणि नयनताराचे लग्न झाल्याच्या अफवा उडाल्या होत्या. पण नाते दीर्घकाळ टिकले नाही. नयनताराची वर्ष 2015 मध्ये नानुम राउडी धान सिनेमात काम करताना विग्नेश शिवन याच्यासोबत भेट झाली. दोघांमध्ये रिलेशनशिप सुरु झाले आणि लग्न केले. नयनतारा सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलींची आई झाली आहे.

शाहरुख खानसोबत काम
वर्ष 2003 मध्ये नयनताराने शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. जवान सिनेमातील शाहरुख आणि नयनताराची जोडी हिट ठरली. अलीकडेच आलेल्या एका वृत्तानुसार, नयनताराने अवघ्या 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी चक्क 5 कोटी रुपये वसूल केले होते. यामुळे भारतातील सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री ठरली होती. ही जाहिरात टाटा स्कायसाठी नयनताराने केली होती. दरम्यान, नयनतारा एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये चार्ज करते.

आगामी सिनेमे
नयनतारा लवकरच 'अन्नपूर्णा: द गॉडेस ऑफ फूड' सिनेमात झळकणार आहे. यामध्ये अन्नपूर्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय टेस्ट, मन्नांगट्टी सिंस 1960, डियर स्टूडेंट्स आणि थानी ओरुवन-2 सिनेमातही दिसणार आहे.

आणखी वाचा : 

सलमान खानसाठी उच्च स्तरावरील सुरक्षा प्रदान, चाहत्यांना सेल्फी काढण्यासही बंदी

कोण आहे सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा, किती घेतो फी?