सार

अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 सिनेमाने रिलीजआधीच धमाका केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने ओटीटी आणि सॅटेलाइट अधिकारांच्या माध्यमातून 900 कोटींची कमाई केली आहे. 6 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या सिनेमाची आतापासून प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे.

Pushpa-2 Movie Pre-Release Collection : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा 'पुष्पा-2' च्या रिलीजची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. सिनेमाच्या रिलीजची तारीख वारंवार पुढे ढकलल्यानंतर अखेर येत्या 6 डिसेंबरला सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. अशातच पुष्पा-2 सिनेमाबद्दलची एक धमाकेदार बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, 500 कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या पुष्पा-2 सिनेमाने रिलीजआधीच 900 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुष्पा-2 सिनेमा देशातील सर्वाधिक महागड्या सिनेमांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे.

अशी झाली सिनेमाची कमाई
टॉलीवूडमुळे भारतीय सिनेसृष्टीचे रुप बदलले जात आहे. प्रत्येक रिलीजसह नवा बेंचमार्क पूर्ण होताना दिसून येत आहे. 'बाहुबली' ते 'कांतरा' सारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करण्यासह काही रेकॉर्ड ब्रेकही केले आहेत. यामुळे टॉलीवूड आता जागतिक स्तरावर पोहोचले आहे.

अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा-2 सिनेमाचा सध्या बोलबाला आहे. पण सिनेमाने रिलीजआधीच रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सुसार, सिनेमाने ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्सच्या माध्यमातून 900 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही आकडेवारी सिनेमाच्या रिलीजआधी होणाऱ्या कमाईच्याबाबतीत फार महत्वाचा असल्याचे मानले जाते. अशी अफवा आहे की, नेटफ्लिक्सने पुष्पा-2 सिनेमा तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा भाषांमधील स्ट्रिमिंगचे अधिकार 270 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत.

650 कोटींना विकले पुष्पा-2 सिनेमाचे थिएट्रिकल राइट्स
रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 सिनेमाचे थिएट्रिकल राइट्स 650 कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 सिनेमाने दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. सिनेमात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहाद फासिल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याआधी सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण काही कारणास्तव सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलत अखेर 6 डिसेंबर ठेवण्यात आली. दरम्यान, वर्ष 2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा-द राइज' चा 'पुष्पा-2' सीक्वल सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 398 कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा : 

अभिनेत्री राधिका आपटेने दिली गुडन्यूज, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल

केवळ 50 सेकंदाच्या शूटसाठी 5 कोटी रुपये घेते? वाचा कोण आहे 'ती' अभिनेत्री