सार
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा पहिला वर्धापनदिन पार पडला. मागील संपूर्ण वर्षात तब्बल दहा लाख प्रेक्षकांनी याला भेट दिली असून अनेक दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले आहेत.
मुंबई : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरने आपल्या पहिल्याच वर्षात कलाविश्वात अनेक विक्रम मोडीत काढले असून गेल्या ३६६ दिवसांमध्ये तब्बल दहा लाख प्रेक्षक आणि ६७० कलाकारांनी ७०० हुन अधिक शो याठिकाणी सादर केले आहेत. प्रेक्षकांनीही या शोवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. या शोमध्ये 'सिव्हिलायझेशन टू नेशन' सारख्या भारतीय थिएटरपासून ते 'द साऊंड ऑफ म्युझिक' सारख्या आयकॉनिक ब्रॉडवे म्युझिकपर्यंत सर्व प्रकारचे शो दाखविण्यात आले आहे.
पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, एनएमएसीसी येथे सलग चार दिवस विशेष शो चे अयोज़न करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी अमित त्रिवेदी यांनी 'भारत की लोकयात्रा' हे अप्रतिम सादरीकरण केले. भारतातील गायक आणि संगीतकार त्यांच्यासोबत रंगमंचावर सामील झाले होते.
पहिल्या वर्षापनदिनानिमित्त नीता अंबानी म्हणाल्या की, गेल्या वर्षभरात एनएमएसीसीने विविध कला परंपरांमधील मास्टर्सचे आयोजन केले आहे. तरुण कलाकारांना पाठिंबा दिला आहे. भारतातील आणि जगभरातील उत्कृष्ट शास्त्रीय आणि लोकसंगीत असलेले, संस्मरणीय नाटके आणि नृत्य सादरीकरणे आयोजित केली गेली आहेत. कला, कलाकार आणि प्रेक्षकांसाठी एनएमएसीसी एक अविश्वसनीय व्यासपीठ असल्याने मला त्याचा खूप आनंद होत आहे.
मुकेश आणि माझे आमचे मिळून एक स्वप्न होते की आपण एक केंद्र तयार करू जे कला, संस्कृती आणि ज्ञान या त्रिमूर्तीचा संगम असेल. जिथे संगीताला नवीन स्वर मिळतात, नृत्याला नवी लय मिळते, कलेला नवे घर मिळते आणि कलाकारांना नवे आकाश मिळावे. आज मी मोठ्या नम्रतेने आणि आत्मविश्वासाने सांगू शकते की ते स्वप्न आता खरे झाले आहे.
आणखी वाचा :
साडे सहा वर्षांनी कपिल शर्माच्या शोमध्ये परतली ‘गुत्थी’; पहिल्याच एपिसोडमध्ये केली धमाल
करण जौहरच्या फ्लॅटमध्ये राहणार इमरान खान, दरमहिन्याचे भाडे ऐकून व्हाल हैराण
40 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट ज्याला बनवायला 16 वर्षे लागली...वाचा सविस्तर