करण जौहरच्या फ्लॅटमध्ये राहणार इमरान खान, दरमहिन्याचे भाडे ऐकून व्हाल हैराण

| Published : Mar 30 2024, 12:46 PM IST

Imran Khan

सार

इमरान खानने आपली प्रेयसी लेखा वॉशिंग्टनसोबत राहण्यासाठी करण जौहरचा फ्लॅट भाड्याने घेतला आहे. या फ्लॅटचे एका महिन्याचे भाडे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

Bollywood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खान (Imran Khan) सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अशातच इमरान खानने आपली प्रेयसी लेखा वॉशिंग्टनसोबत (Lekha Washington) राहण्यासाठी अखेर घर शोधले आहे, कपलने मुंबईतील वांद्रे परिसरात एक अपार्टमेंट भाड्याने घेतले असून त्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. खरंतर आलिशान घराचा मालक बॉलिवूडमधील सिनेनिर्माता करण जौहर (Karan Johar) आहे.

करण जौहरच्या घरात राहणार इमरान खान
इमरान खान आणि लेखा वॉशिंग्टन करणला एका महिन्यासाठी तब्बल 9 लाख रुपये भाडे देणार आहे. करणच्या घरातून समुद्राचा व्हिव्यू दिसतो. याआधी करण जौहरच्या या घराच्या बाजूला असलेल्या इमारतीत आमिर खानने भाड्याने घेतले होते.

शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहिमसह माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे घर असलेल्या ठिकाणीच इमरान आणि त्याची प्रेयसी लेखा राहणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घराचा अधिकृत करार 20 मार्चला झाला आहे. याआधी इमान वांद्रे येथील पाली हिल येथील आपल्या बंगल्यात राहत होता.

लेखा आणि इमरानचे रिलेशनशिप
इमरानने लेखासोबतच्या नात्याबद्दल गेल्या काही काळाआधी उघड केले आहे. याआधी इमरानचा विवाह अवंतिका मलिक सोबत झाले होता. दरम्यान, लग्नाच्या काही वर्षानंतर वर्ष 2019 मध्ये इमरान आणि अवंतिकाचा घटस्फोट झाला.

दुसऱ्या बाजूला लेखाचा एक्स-पती पत्रकार पाबलो चटर्जी आणि इमरान खुप चांगले मित्र होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इमरान खानच्या घटस्फोटाआधी लेखाला भेटता यावे यासाठी त्याने एक घर भाड्यानेही घेतले होते. शेजाऱ्यांनीही बऱ्याचदा लेखा आणि इमरान यांना एकमेकांसोबत स्पॉट केले होते.

आणखी वाचा : 

तमिळ सिनेसृष्टीतील अभिनेता डेनियल बालाजी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

काय सांगताय अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांनी लग्न नाही तर साखरपुडा केला...

महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; आजच्या ज्वलंत परिस्थितीवर येणार नवा चित्रपट