Munjya Box Office Collection Day 1: प्रेक्षकांवर चालली 'मुंज्या' सिनेमाची जादू, पहिल्याच दिवशी कमावले एवढे कोटी

| Published : Jun 08 2024, 08:30 AM IST / Updated: Jun 08 2024, 08:32 AM IST

Munjya Box Office Collection Day 1

सार

Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर नुकताच प्रदर्शित झालेला मुंज्या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. अशातच पहिल्याच दिवशी सिनेमाने केलेल्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.

Munjya Box Office Collection Day 1: मुंज्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी (7 जून) प्रदर्शित झाला आहे. मुंज्या भारतातील पहिलाच असा सिनेमा आहे जो सीजीआय (कंप्युटर-जनरेटेड इमेजरी) असून हॉरर आणि कॉमेडीची मजा प्रेक्षकांना लुटता येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यामुळे मुंज्या सिनेमाची जोरदार चर्चा झाली. सिनेमाच्या ट्रेलरनंतर आता प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अशातच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी किती रुपयांची कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.

पहिल्या दिवसाची सिनेमाची कमाई
आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मुंज्या सिनेमाने पहिल्याच दिवशी 2.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बातम्यांनुसार सिनेमाने शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या माध्यमातून 1.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय मुंज्या सिनेमाची सिनेपोलिस कमाई 33 लाख रुपये झाली आहे. एकूणच पहिल्याच दिवसाच्या अखेरपर्यंत सिनेमाची कमाई 2.75 कोटी ते 3 कोटी रुपायंपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंज्या सिनेमाची पहिल्याच दिवसाचे एकूण नक्की कलेक्शन किती झाले याबद्दल शनिवारी (08 जून) कळणार आहे. या सिनेमात शर्वरी वाघ, मोना सिंह, अभय वर्मा आणि सत्यराज असे काही कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मुंज्या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. खास गोष्ट अशी की, सिनेमात वरुण धवनचा कॅमिओ रोल देखील आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View post on Instagram
 

सिनेमाचे 50 टक्के बजेट VFX वर खर्च
मुंज्या सिनेमात स्पेशल इफेक्टसाठी ब्रिटिश कंपनी DNEG सोबत कोलॅब्रेशन करण्यात आले आहे. या कंपनीने 'ड्यून', 'जस्टिस लीग' आणि 'अ‍ॅक्वामॅन' सारख्या सिनेमांसाठी स्पेशल इफेक्ट्स तयार केले होते. न्यूज एजेंसी पीटीआयसोबत संवाद साधताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी म्हटले की, "आमच्या सिनेमाचे पंन्नास टक्के बजेट व्हीएफएक्सवर खर्च झाले आहेत. खरंतर ही एक मोठी रक्कम आहे. यावरुन कळते की, सिनेमासाठी व्हीएफएक्स किती महत्त्वाचे आहे. आम्ही सीजीआय आणि व्हीएफएक्सच्या मदतीने क्रिएचर तयार केले आहे. यावर खूप रिसर्च देखील करण्यात आला."

आणखी वाचा : 

अक्षय कुमार ते दिग्दर्शक अनुभव सिन्हा नव्हे 'या' व्यक्तींच्या प्रेमात वेडी होती Shilpa Shetty

'पंजाबीच सर्वाधिक मोठे देशभक्त', गैरवर्तवणुक प्रकरणात कंगना राणौतच्या विधानावर खासदाराने केले विधान, म्हणाल्या…