- Home
- Entertainment
- South Celebs : या दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी बांधलीये लग्नगाठ
South Celebs : या दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी बांधलीये लग्नगाठ
बंगळुरु - वेगवेगळ्या धर्माचे असूनही, सांस्कृतिक फरक असूनही, दक्षिण भारतातील काही सेलेब्जनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे संसारीक आयुष्यही मजेत सुरु आहे. ते कोण आहेत? जाणून घ्या…

कोणकोण लग्नबंधनात अडकले?
राहुल शर्मा आणि असिन
राहुल शर्मा आणि असिन यांनी २०१६ मध्ये लग्न केले. राहुल शर्मा हिंदू आहेत, तर असिन ख्रिश्चन आहेत. खाजगी सोहळ्यात झालेल्या या लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. या जोडप्याला एक मुलगी आहे. दोघांची सुखी कुटुंब असून दोघेही अतिशय मजेत जीवन जगत आहेत.
प्रियामणी, मुस्तफा राज
कन्नडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रियामणी हिंदू आहेत. २०१७ मध्ये त्यांनी उद्योजक मुस्तफा राज यांच्याशी लग्न केले. बंगळुरूमध्ये खूप खाजगी सोहळ्यात हे लग्न पार पडले. हिंदू-मुस्लिम समजात हे लग्न झाले असले तरी दोघेही आपापला धर्म पाळतात. दोघेही मजेत आहेत.
सूर्या आणि ज्योतिका
सूर्या आणि ज्योतिका ही जोडी भारतीय चित्रपटसृष्टीत खूप लोकप्रिय आहे. सूर्या हिंदू आहेत, तर ज्योतिका पंजाबी मुस्लिम आहेत. तमिळ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्योतिका यांनी सूर्यांना प्रपोज केले होते. त्या तमिळही शिकल्या आहेत. आज ज्योतिका दक्षिण भारतात पूर्णपणे रुळल्या आहेत. २००६ मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याला दिया आणि देव ही दोन मुले आहेत.

