KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन यांनी वसूल केली एवढी Fees

| Published : Aug 14 2024, 03:08 PM IST

Amitabh Bachchan KBC 16 Registration

सार

अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' चा 16 वा सीजन सुरू झाला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना बिग बी शो चे सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहे. पण अमिताभ बच्चन यांनी बिग बॉसच्या शो साठी वसूल केलेली फी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

Kaun Banega Crorepati Season 16 :  बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांचा क्विज रिअ‍ॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीचा 16 वा सीझन सुरु झाला आहे. प्रत्येक वर्षी कौन बनेगा करोडपती शो ची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जाते. यंदाच्या वर्षीही शो चे सूत्रसंचालन बिग बी करणार आहेत. पण शो साठी अमिताभ बच्चन यांनी तगडी फी वसूल केली आहे.

KBC च्या प्रत्येक सीजनसाठी घेण्यात आलेली फी

  • KBC 1– 25 लाख प्रति एपिसोड
  • KBC 2– 25 लाख प्रति एपिसोड
  • KBC 4– 50 लाख प्रति एपिसोड
  • KBC 5– 50 लाख प्रति एपिसोड
  • KBC 6- 1.5 कोटी ते 2 कोटीच्या दरम्यान प्रति एपिसोड
  • KBC 7– 1.5 कोटी ते 2 कोटीदरम्यान प्रति एपिसोड
  • KBC 8– 2 कोटी प्रति एपिसोड
  • KBC 9– 2.9 कोटी प्रति एपिसोड
  • KBC 10– 3 कोटी प्रति एपिसोड
  • KBC 11– 3.5 कोटी प्रति एपिसोड
  • KBC 12– 3.5 कोटी प्रति एपिसोड
  • KBC 13– 3.5 कोटी प्रति एपिसोड
  • KBC 14– 4 कोटी से 5 कोटीच्या दरम्यान प्रति एपिसोड
  • KBC 15– 4 कोटी से 5 कोटींच्या दरम्यान प्रति एपिसोड
  • KBC 16– 5 कोटी प्रति एपिसोड

वर्ष 2000 रुपयांपासून सुरु झाला होता शो
अमिताभ बच्चन यांनी वर्ष 2000 मध्ये केबीसीची सुरुवात केली होती. हा शो ब्रिटीश शो 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेयर?' पासून सुरु करण्यात आला आहे. या शो आधी पहिल्या सीजनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यानंतर दुसरा सीजनही सुरु झाला होता. पण आरोग्याच्या समस्यांमुळे बिग बी यांना शो सोडावा लागला होता. अशातच शाहरुख खानने शो तिसऱ्या सीजनचे सूत्रसंचालन केले होते. या सीजननंतर 4 ते 16 सीजनपर्यत अमिताभ बच्चन यांच्याकडून सूत्रसंचालन केले जाते.

आणखी वाचा : 

श्रद्धा कपूरला Stree-2 नव्हे रणबीरसोबतच्या सिनेमासाठी मिळालीय सर्वाधिक फी

'शोले' ते 'एक था टायगर', बॉलिवूडमध्ये 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेत हे सिनेमे