कॉमेडियन कपिल शर्माच्या नवीन कॅफेवर गोळीबार झाल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील कॅफेवर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
कॉमेडियन कपिल शर्मा याने याच्या नवीन कॅफेवर गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण बॉलिवूड जगतात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री या कॅफेवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. गेल्याचा आठवड्यात हा कॅफे सुरु केल्यामुळं तो जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. आता गोळीबार झाल्यामुळं त्याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
रात्रीच्या वेळी केला गोळीबार
ब्रिटिश कोलंबियामधील सरे या ठिकाणी असणाऱ्या एका इमारतीमध्ये हा कॅफे उघडण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे रात्री आले आणि कारमधून परत निघून गेले. हल्लेखोरांनी या कॅफेच्या समोरील बाजूस गोळीबार केला पण यात कोणीही जखमी झालं नाही.
कपिलकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
कपिल शर्मा आणि त्याच्या पत्नीकडून यासंदर्भात अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने तात्काळ नाकाबंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात फायनान्शियल एक्सप्रेस यांनी अधिकृत माहिती दिली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा संशयित कार्यकर्ता आणि NIA च्या यादीतील दहशतवाद्यांपैकी एक असणाऱ्हया रजीत सिंग लाडी याने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. रिपोर्टनुसार, लाडीने असे म्हटले आहे की, कपिल शर्माच्या आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे त्याने हा हल्ला केला. मात्र अद्याप या टिप्पणीविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कपिलचा शो नेटफ्लिक्सवर दणक्यात झाला सुरु
कपिलचा शो एका बाजूला नेटफ्लिक्सवर दणक्यात सुरु झाला आहे. दुसरीकडे त्याने हा कॅफे सुरु केला असून त्याला या बिझनेसकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या पण हा हल्ला त्याच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हा कॅफे २ वर्षाच्या मेहनतीनंतर सुरु झाला होता पण त्याच्यावर हल्ला केल्यामुळं आता कपिल शर्माच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
