सार

मेगा बजेट असणारा सिनेमा 'कल्की 2898एडी' सिनेमा येत्या 27 जूनला प्रदर्शित होणार आहे. असा अंदाज लावला जात आहे की, सिनेमा शाहरुखचा 'जवान'च्या पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो.

Kalki 2898AD Movie 5 Reasons to Watch : साउथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘कल्कि 2898 एडी’ सिनेमाची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. या सिनेमात प्रभाससह (Prabhas) काही दिग्गज बॉलिवूडसह साउथमधील कलाकार झळकणार आहेत. येत्या 10 जूनला कल्कि 2898 एडीचा ट्रेलर लाँच होणार आहे. तत्पूर्वी कल्कि 2898 एडी सिनेमा शाहरुखच्या जवान सिनेमाचा पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक करणार का याची चर्चा सुरु झाली आहे.

सिनेमाचे धमाकेदार प्रमोशन
कल्कि 2898 एडी सिनेमाचे साउथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही धमाकेदार प्रमोशन केले जाणार आहे. निर्मात्यांकडून प्रमोशन स्ट्रॅटजीचे प्लॅनिंग केली जात आहे. खरंतर, सिनेमात प्रभाससह दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अशातच सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी मुंबईत एक मोठ्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. खरंतर, कार्यक्रम एक प्री-रिलीज इवेंटसारखा असणार आहे. सध्या निर्मात्यांकडून सोहळ्यासाठी ठिकाण शोधले जात आहे.

जवान सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करणार?
7 सप्टेंबर, 2023 रोजी एटली कुमार यांचा सिनेमा 'जवान' प्रदर्शित झाला होता. सिनेमाचे प्रोडक्शन शाहरुख खानची कंपनी रेड चिलीजने सांभाळले होते. Sacnilk च्या मते सिनेमाचे बजेट 400 कोटी रुपये होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 89.1 कोटी रुपयांची कमाई केली होती. याशिवाय जवान सिनेमाची पहिल्याच दिवशीच्या कमाईची अद्याप कोणत्याही सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेली नाही. अशातच आता 27 जूनला 'कल्कि 2898' सिनेमा प्रदर्शित होणार असून जवानचा रेकॉर्ड ब्रेक करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कल्कि 2898एडी सिनेमा पाहण्याची 5 कारणे

  • सिनेमा कल्कि 2898एडी सिनेमाचे निर्देशन नाग अश्विन यांनी केले आहे. सिनेमाची कथा देखील अश्विन यांनी लिहिली आहे. अश्विन यांना अनेकदा राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.
  • सिनेमात काही वैज्ञानिक गोष्टी दाखवल्या जाणार असून सिनेमात हिंदू धार्मिक ग्रंथ महाभारतातील काही गोष्टी घेण्यात आल्या आहे. यामध्ये अश्वत्थाम महत्वाचे पात्र आहे. ही भूमिका अमिताभ बच्चन साकारत असल्याचे टीझरमध्ये दिसून आले आहे.
  • कल्कि 2898एडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सिनेमात प्रभासचा वेगळा लूक सर्वांवर ठसा उमटवणारा ठरू शकतो अशी देखील चर्चा आहे.
  • कल्कि 2898एडी सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा अश्वत्थामाचा लूक खूप व्हायरल झाला होता. याआधी अशी बातमी आली होती की, अमिताभ बच्चन यांची सिनेमात लहान भूमिका असेल. पण निर्मात्यांनी स्पष्ट केलेय की, अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारणार आहेत. दुसऱ्या बाजूला दीपिका पादुकोणचे पात्र फार वेगळे असणार आहे.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल काल्पनिक रुपात काही गोष्टीही दाखवल्या जाणार आहेत. सिनेमाची पहिल्या दिवशीची बॉक्स ऑफिसवरील कमाई 100 कोटींच्या पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा : 

Mr And Mrs Mahi सिनेमाची धिम्या गतीने कमाई, पाहा 5व्या दिवशीचे कलेक्शन

तनीषा मुखर्जीच्या फ्लॉप करियरमागे काजोलचा हात? अभिनेत्री म्हणते…