Entertainment

Mr And Mrs Mahi सिनेमाची धिम्या गतीने कमाई, पाहा 5व्या दिवशीचे कलेक्शन

Image credits: Social Media

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा

मिस्टर अँड मिसेस माही सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून दोघांच्या जोडीला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Image credits: Social Media

सिनेमाच्या कमाईत घट

मिस्टर अँड मिसेस माही सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता बॉक्स ऑफिसवर त्याच्या कमाईत घट होताना दिसून येत आहे. वीकेंडला देखील कमाई पहिल्या दिवसाच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले.

Image credits: Social Media

ओपनिंग डे कलेक्शन

सिनेमाचे ओपनिंग डे चे कलेक्शन 6.75 कोटी रुपये होते. दुसऱ्या दिवशी 4.6 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.5 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली.

Image credits: Social Media

सिनेमाची 5व्या दिवशीची कमाई

मिस्टर अँड मिसेस माही सिनेमाच्या कमाईत घट होताना दिसून येत आहे. 5व्या दिवशी सिनेमाने 2.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: Social Media

सिनेमाची भारतातील एकूण कमाई

सिनेमाने भारतात एकूण 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Image credits: Social Media