सार
बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमाई करणाऱ्या कल्कि 2898 एडी सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांनीही दमदार भूमिकेने प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. पण सिनेमात अमिताभ यांचा बॉडी डबलचा रोल कोणी केलाय हे माहितेय का?
Kalki 2898 AD Movie : बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलेल्या कल्कि 2898 एडी सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सिनेमाने देशाअंतर्गत बॉक्स ऑफिसवर 645.8 कोटी रुपये तर जगभरात 1041.65 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमात अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील अमिताभ बच्चन यांचे रुप प्रेक्षकांना हैराण करणारे ठरले. वयाच्या 81 व्या वर्षातील पुरुषाची भूमिका साकारणे सोपे नव्हते. पण यामध्ये एक ट्विस्ट असून अमिताभ बच्चन यामध्ये भूमिकेसाठी बॉडी डबलचा वापर करण्यात आला आहे. याचा खुलासा बॉडी डबलची भूमिका साकारणाऱ्या कलाकारानेच केला आहे.
कल्कि सिनेमातील अमिताभ बच्चन यांची भूमिका
कल्कि 2898 एडी सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या बॉडी डबलमध्ये जो व्यक्ती दिसाल त्याचे नाव सुनील कुमार आहे. सुनील कुमारने 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या स्री-2 सिनेमात मानकाप्याची भूमिका साकारली आहे. खुद्द सुनील कुमारने एका संवादावेळी म्हटले की, कल्कि 2898 एडी सिनेमात मी अमिताभ बच्चन यांच्या बॉडी डबलच्या रुपात काम केले आहे.
असा मिळाला सिनेमा
सुनील कुमारने इंडिया टुडेसोबत बातचीत करताना म्हटले की, "माझ्या उंचीमुळे जाहिरात आणि साउथ सिनेमांमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली. अशातच कल्कि 2898 एडी सिनेमा हाती लागला. सिनेमात काम करताना मला पाहण्यासाठी परिवारातील मंडळी खूप उत्साही होती. कारण आम्ही सर्वजण अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहोत. मला त्यांच्या बॉडी डबलच्या रुपात काम करण्याची संधी मिळाली. शूटिंगही धमाकेदार होते. यावेळी काही स्टंट करायला मिळाले."
कोण आहे सुनील कुमार?
सुनील कुमार जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस खात्यात कार्यरत आहे. सुनीलची उंची 7.7 फूट आहे. कल्कि 2898 एडी सिनेमानंतर स्री-2 सिनेमात मानकाप्याची भूमिका सुनीलने साकारली आहे. पण सिनेमात सुनीलच्या चेहऱ्यासाठी ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. स्री-2 सिनेमाने जगभरात 630 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सध्या सुनील कुमारला बिग बॉस-18 सीजनसाठी देखील विचारण्यात आले आहे.
आणखी वाचा :
दीपिका पादुकोण-रणवीर सिंहच्या घराचा VIDEO व्हायरल, किंमत ऐकून व्हाल हैराण
गणेशोत्सवावेळी इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करा, सलमान खानचे नागरिकांना आवाहन